DGIPR चे अधिकारी पगार महाराष्ट्र सरकारचा घेतात व काम बिहारसाठी करतात काय? – जनतेचा सवाल
श्री.सुनील उत्तमराव साळवे
(9637661378)
मुख्य संपादक
VANSH NEWS Digital media services.
मुंबई :- 13 जुलै 2025
महाराष्ट्र शासनाचे माहिती व जनसंपर्क महासंचनालय विभाग हा महाराष्ट्र शासनातर्फे राबविण्यात येणारे सर्व शासकीय कार्यक्रम व शासकीय माहिती त्यांच्या DGIPR या अधिक्रृत संकेतस्थळावरुन जनतेला पुरवत असते. या पेजवरुन जनतेचा व शासनाचा थेट संपर्क होत असतो. जनतेकडून येत असलेल्या सुचना व सल्ले यांचा प्रशासन व शासकीय कामकाज सुधारासाठी महत्वाचा ठरतो. परंतु महाराष्ट्र शासनाने सुरु केलेले DGIPR संकेतस्थळ /अधिक्रृत पेज बिहारी अधिकाऱ्यांनी हायजैक तर केेले नाही ना अशी शंका आता उपस्थित होते. त्या शंकेला काण ही ठरले आहे.
महाराष्ट्र DGIPR या अधिक्रृत पेजवरुन दि. 12 जूलै 2025 रोजी रात्री दिलेल्या माहितीत सांगितले कि भारत निवडणूक आयोगाने बिहारमधील सर्व मतदारांशी थेट संपर्क प्रस्थापित केला आहे. महाराष्ट्र DGIPR या पेजवरुन फक्त महाराष्ट्राशी संबंधित माहिती देणे बंधनकारक असतांना बिहार निवडणुकीसंदर्भात भारत निवडणूक आयोगाने केलेल्या थेट संपर्काची माहिती दिल्याने महाराष्ट्र DGIPR हे संकेतस्थळ बिहारी अधिकाऱ्यांनी हायजैक तर केले नाही ना अशी शंका आता महाराष्ट्रातील मराठी नागरिकांनी व्यक्त केली आहे.


येत्या काही महिन्यांत बिहार विधानसभा निवडणुक आहे. बिहार निवडणुकीच्या अनुषंगाने किती नवमतदारांची नावनोंदणी झाली याबाबत माहिती महाराष्ट्र DJIPR या पेजवरुन देण्याची काय आवश्यकता आहे? महाराष्ट्र DGIPR पेज चालवणारे अधिकारी महाराष्ट्र शासनाकडून पगार घेतात आणि है अधिकारी बिहार राज्यासाठी काम करतात काय असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.
बिहार निवडणुकीसंबंधाने एवढी जागरुकता महाराष्ट्र DGIPR पेजने दाखवली तेवढी जागरुकता महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 ला का दाखवली नाही असा प्रश्न सुद्धा महाराष्ट्रातील जागरुक नागरिकांनी उपस्थित केला आहे. महाराष्ट्र DGIPR हे संकेतस्थळ नेमके कोण चालवतात? आणि या संकेतस्थळावरुन महाराष्ट्रातील जनतेला पुरवली जाणारी माहिती योग्य कि अयोग्य हे कोण ठरवणार? महाराष्ट् DGIPR या संकेतस्थळावरुन महाराष्ट्र शासनाची इत्यंभु माहिती प्रसारित केली जावे. इतर राज्याची माहिती प्रसारित करणाऱ्या महाराष्ट्र द्रोही अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी जनतेची मागणी आहे.
