श्री.सुनील उत्तमराव साळवे
(9637661378)
मुख्य संपादक
VANSH NEWS Digital media services
कोराडी /नागपूर – 10 जुलै 2025
महादुला कोराडी येथील बहूजन विद्युत अभियंता, अधिकारी व कर्मचारी फोरम चे केंद्रीय उपाध्यक्ष सचिन मानवटकर यांनी Vansh News Digital Portal ला पाठवलेल्या एका प्रेस नोटमध्ये मुख्य अभियंता कोराडी यांचेवर गंभीर आरोप केले की, एका राजकीय व्यक्तीच्या दबाव त्यांनी आर्थिक हितसंबंध जोपासत मागील 1 ते दीड वर्षापासून जवळपास 25-30 अनुभवहीन लोकांना गरज नसतांना ही 3-3 लाखांच्या इन्क्वायरी ची कामे दिली. हु कामे अत्यंत निक्रृष्ट दर्जाचे झाल्याने महाजेनको प्रशासनाचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान मुख्य अभियंता कोराडी यांच्यामुळे झाले आहे. सचिन मानवटकर यांनी कोराडी महाजेनको चे मुख्य अभियंता विलास मोटघरे यांचेवर एक प्रकारे मोठे गंभीर आरोप करीत त्यांची महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार शामकुमार बर्वे? माजी मंत्री सुनील केदार, ऊर्जा सचिव व व्यवस्थापकीय संचालक महाजेनको प्रशासन यांना एका पत्राद्वारे केली आहे.



सचिन मानवटकर यांनी असाही आरोप केला की मुख्य अभियंता विलास मोटघरे यांनी व्यवस्थापकीय संचालक महाजेनको प्रशासन यांची कोणतीही लेखी परवानगी न घेता महाजेनको कोराडी जवळपास 150-200 कंत्राटी कामगारांची नियुक्ती कंत्राटदाराकडे केली आहे. यासंबंधी माहिती अधिकारात कोणतीही माहिती दिली जात नसल्याचा ही आरोप सचिन मानवटकर यांनी एका प्रेस नोटमध्ये केला आहे.
याबाबतीत आम्ही मुख्य अभियंता कोराडी महाजेनको विलास मोटघरे यांची प्रतिक्रिया त्यांच्या भ्रमणध्वनी वर जानुन घेण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचेशी आमचा संपर्क होऊ शकला नाही. जेव्हा ही त्यांचा संपर्क होईल तेव्हा आम्ही त्यांची प्रतिक्रिया नक्की घेऊ.
आम्ही श्री. विलास मोटघरे मुख्य अभियंता कोराडी महाजेनको त्यांचेशी WhatsApp वर संपर्क केला असता त्यांनी No Comments असे उत्तर दिले आहे.
