दि. 5 ते 7 नोव्हेंबर 2025 “ड्रॅगन पॅलेस फेस्टीवल” चे आयोजन.
श्री. सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online
कामठी/नागपुर : 4 नोव्हेंबर 2025
विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस व्या 26 व्या वर्धापन दिना निमित्त आज जपान येथील भिख्खु संघाचे नागपुर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले. या प्रसंगी जपान येथील पुजनीय भिख्खु संघाचे धम्मसेवक धम्मसेविका यांच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले. या वेळी ड्रॅगन पॅलेस च्या प्रमुख व ओगावा सोसायटीच्या अध्यक्षा ॲड. सुलेखाताई कुंभारे प्रामुख्याने उपस्थित होत्या.
जपान येथील सुप्रसिध्द असलेल्या मिनोबुसन क्यओनजी विहाराचे प्रमुख वंदनीय पुज्य भंतेजी तेनजेन हामाजिमा, ग्योहो उचीयामा, गोन्शी वातानाबे, केन्सो होशिनो, क्योसेई कोमानो, म्योकेन कुडो, कैओ सुजुकी, शोकोह शिन्मा, होर्यु हानेडा, होजु शिओटा, कोगाकु उजीहाय, गीशुन सुजुकी, कात्सुम सुजुकी, हिबीकी सैतो, होर्यु ताकानावे, बुन्जो तमाका, युकी इतो, हीरोया ओकीताते, केईजी साकुराई इत्यादीचा पुजनीय भिख्खु संघाच्या शिष्ट मंडळात समावेश आहे.
बुधवार दिनांक 5 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता जपान येथील वंदनीय पुज्य भिक्षु संघ यांच्या उपस्थितीत विशेष बुध्द वंदना व धम्मदेसना कार्यक्रम संपन्न होणार आहे. विशेष बुध्द वंदना जपान येथील सुप्रसिध्द असलेल्या मिनोबुसन क्युओनजी विहाराचे प्रमुख वंदनीय पुज्य भंतेजी तेनजेन हामाजिमा यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात येणार आहे.
दादासाहेब कुंभारे परिसरातील ड्रॅगन पॅलेस कॅम्पस येथे दुपारी 12 वाजता मुख्य समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षास्थानी ड्रॅगन पॅलेस टेम्पल च्या प्रमुख ॲड. सुलेखाताई कुंभारे राहतील. सभा मंचावर जपान येथील मिनोबुसन वयुओनजी विहाराचे प्रमुख वंदनीय पुज्य भंतेजी तैनजेन हामाजिमा, मलेशिया येथील शिंग्यो इमाई, भीलंका येथील भदंत आर्यधम्म थेरो इत्यादी पुजनीय भंतेजी उपस्थितांना धम्म उपदेश देतील.

‘ड्रॅगन पॅलेस फेस्टीवल अंतर्गत ड्रॅगन इंटरनॅशनल स्कुल, हस्दास विद्यालय तसेच स्थानिक कलावंतांव्दारे प्रबोधनपर सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात येणार आहे. सायंकाळी 7 वाजता मुंबई येथील सुप्रसिध्द पावा म्युजिकल बैंड यांच्याद्वारे म्युजीक मेडटिशनचे सादरीकरण करण्यात येणार आहे.
गुरूवार दि. 6 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता कौमी एकता मुशायराचे आयोजन करण्यात आले आहे या कौमी एकता मुशायराचे उद्घाटन ड्रॅगन पॅलेसच्या प्रमुख ॲड. सुलेखाताई कुंभारे यांच्या शुभ हस्ते होणार आहे. तसेच महाराष्ट्र अल्पसंख्यांक आयोगचे अध्यक्षा प्यारे खान व माजी पोलीस महासंचालक डॉ. भुषणकुमार उपाध्याय यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. मुशायराचे मुख्य आकर्षण फिल्म अभिनेते रजा मुराद यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. या मुशायराचे संचालन लखनऊ येथील नदीम फारूकी करणार असुन या मुशायरामध्ये आरफ सैफी हैद्राबाद, मनिका दुबे जबलपुर, बिलाल सहारनपूरी सहारनपुर, जुनैद अख्तर कांडला, जहाज देवबंदी देवबंद, सरीता जैन गाजीयाबाद इत्यादी शायरांचा सहभाग राहील.
दिनांक 7 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता ‘प्रणाम भीम बुध्द चरणी’ गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी महाराष्ट्रातील प्रसिध्द गायीका कडूबाई खरात तसेच शिलवंत सोनटक्के व स्थानिक गायक यांचा प्रबोधनपर बुध्द व भीम गीतांचे सादरीकरण होईल.
‘ड्रॅगन पॅलेस फेस्टीवल’ निमित्त प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आलेले असून यामध्ये शासनाच्या विविध योजनाची माहीती देणारे स्टॉल, जिल्हा उद्योग केंद्र, महीला आर्थिक विकास महामंडळ, खादि ग्रामोद्योग आयोग, सुक्ष्म व लघु उद्योग विभाग, सामाजिक न्याय विभाग इत्यादी प्रदर्शनी मध्ये विविध प्रकारच्या वस्तूंची विक्री व खादय पदाथचि स्टॉल राहणार आहेत.
या सोहळ्यात विविध देशांतील बौध्द अनुयायी, धर्मगुरू, संशोधक आणि सामाजिक कार्यकर्ते सहभागी होणार असुन आंतरराष्ट्रीय बंधुत्व, जागतिक शांतता आणि सामाजिक समरसता हा या कार्यक्रमाचा मुख्य संदेश असेल. कार्यक्रमादरम्यान सांस्कृतिक कार्यक्रम, धर्मप्रसार आणि मानवी एकतेचा भाव यांचा संगम दिसुन येणार आहे. या भव्य आयोजनाच्या माध्यमातुन जागतिक स्तरावरची एकात्मता आणि मैत्रीपूर्ण नातेसंबंध अधि दृढ होतील. करिता या ‘ड्रॅगन पॅलेस फेस्टीवल’ मध्ये जास्तीत जास्त संख्येनी उपस्थित राहुन कार्यक्रमाचा लाभ प्यावा असे आव्हान ड्रॅगन पॅलेसच्या प्रमुख, माजी राज्यमंत्री ॲड. सुलेखाताई कुंभारे यांनी केले.


































