श्री सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online
सोलापूर : 15 नोव्हेंबर 2025
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ऐन निवडणुकीच्या तोंडावर सोलापूर जिल्ह्यातील करमाळा शहरात शिवसेना (शिंदे गट) मध्ये मोठे राजकीय खिंडार पडले आहे. माजी आमदार जयवंतराव जगताप यांची शिवसेना (शिंदे गट) च्या नगरपालिका निवडणूक प्रभारी पदी नियुक्ती होताच, विद्यमान शिवसेना नेते दिग्विजय बागल यांच्या समर्थकांनी आक्रमक भूमिका घेत सामूहिक राजीनामा दिला आहे. या राजीनाम्यांमुळे शिवसेना शिंदे गटाला आगामी निवडणुकीत मोठा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सुत्राकडुन मिळालेल्या माहितीनुसार, दिग्विजय बागल आणि त्यांचे समर्थक हे भाजपा च्या वाटेवर आहेत.
55 शाखाप्रमुखांचा सामूहिक राजीनामा
माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या नियुक्तीमुळे नाराज झालेल्या दिग्विजय बागल यांच्या गटातील तब्बल 55 शाखाध्यक्ष आणि पदाधिकारी यांनी आपल्या पदांचा सामूहिक राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. या पदाधिकाऱ्यांनी नोंदणी केलेले 20 हजार सभासद देखील पक्षातून बाहेर पडणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
वरिष्ठाकडून विश्वासात घेतले जात नसल्याने हा राजीनामा देण्याचा निर्णय या पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे.

करमाळा येथे आयोजित करण्यात आलेल्या शाखा प्रमुखांच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. यावेळी मकाई कारखान्याचे संचालक सतीश निळ, आशिष गायकवाड, राजेंद्र मोहोळकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक कुलदीप पाटील, माजी संचालक आनंदकुमार ढेरे, रंगनाथ शिंदे, माजी सरपंच नवनाथ बदर, अशोक हनपूडे, रावगावचे सरपंच संदीप शेळके, राणा वाघमारे, विजयसिंह हाके, रवी शेळके , अक्षय सरडे, केशव बोराडे, साधू शिंदे, आनंद टेकाळे, विजय काळे, प्रशांत पवार, केशव बोराडे, संदीप गोडसे, महादेव माने, सतीश सोनवणे, दत्तात्रेय काळे, लहू पवार, सचिन शिंदे, पप्पू सरक, शहाजी काळे, दीपक हाके, संदीप हाके, सतीश घेडे, हेमंत शिंगरे, सुदाम झोळ, हेमंत गिरंजे, संजय डोळे, संतोष चांदणे, ओमकार करे, प्रमोद हाके, प्रतीक हाके, विशाल माने, किरण डोंगरे, संदेश भोगे, जावेद पठाण, मुबारक इनामदार आधी शाखाप्रमुखांनी राजिनामे दिले.
दिग्विजय बागल यांनी यापूर्वी शिवसेना (शिंदे गटाकडून) करमाळा विधानसभेची निवडणूक लढवली होती. त्यामुळे त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने पक्षात कार्यरत आहेत. माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या नियुक्तीमुळे त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी पसरली आहे.




































