भाजप बरिएमं युतीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून अजय कदम होण्याची दाट शक्यता!
श्री. सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online
कामठी /नागपुर : 11 नोव्हेंबर 2025
होऊ घातलेल्या कामठी नगर परिषदेच्या निवडणुकीकरिता इच्छुक उमेदवारांनी ॲड. सुलेखाताई कुंभारे यांच्या कार्यालयात गर्दी केली असून पूर्ण 17 प्रभागामधील इच्छुक असलेल्या इच्छुक उमेदवारांनी भाजपा – बहुजन रिपब्लिकन एकता मंच युतीची उमेदवारी मिळण्याकरिता ॲड. सुलेखाताई कुंभारे यांचे कडे अर्ज सादर केले.

34 नगरसेवकाच्या उमेदवारी करिता शंभरच्या वर अर्ज प्राप्त झाले असून मंगळवार पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत, अर्जांची छाननी केल्यानंतर बुधवार व गुरुवारी उमेदवारांची मुलाखत घेऊन उमेदवार यादी जाहीर करण्यात येणार आहे.
अनुसूचित जाती व्यतिरिक्त ओबीसी सर्वसाधारण महिला राखीव प्रभागातून अनेक इच्छुकांनी निवडणूक लढण्यासाठी अर्ज सादर केले, विशेषतः यामध्ये महिला उमेदवारांची संख्या लक्षणिय आहे.
यामध्ये प्रभाग क्रमांक 1– 3 अर्ज, प्रभाग क्रमांक 2– 5 अर्ज, प्रभाग क्रमांक 3– 4 अर्ज, प्रभाग क्रमांक 4 — 3 अर्ज, प्रभाग क्रमांक 5 — 3 अर्ज, प्रभाग क्रमांक 6 — 4 अर्ज, प्रभाग क्रमांक 7 — 4 अर्ज, प्रभाग क्रमांक 8 — 5 अर्ज प्रभाग क्रमांक 9– 3 अर्ज प्रभाग क्रमांक 10 — 3अर्ज, प्रभाग क्रमांक 11 — 5 अर्ज, प्रभाग क्रमांक 12 — 7 अर्ज, प्रभाग क्रमांक 13– 4 अर्ज, प्रभाग क्रमांक 14 — 3 अर्ज, प्रभाग क्रमांक 15 — 5 अर्ज, प्रभाग प्रभाग क्रमांक 16 — 4 अर्ज, व प्रभाग क्रमांक 17 — 3 अर्ज इत्यादींचा समावेश आहे.
आठ वर्षानंतर नगरपरिषदेची निवडणूक होत असल्यामुळे कामठीच्या जनतेमध्ये प्रचंड उत्साह असून येणारा नगराध्यक्ष कोण होईल याची उत्सुकता दिसून येते. कामठीची जनता कामठी शहराच्या दुरावस्थेने त्रस्त झाली आहे कामठी शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य रस्त्यांची समस्या असून मागील नगराध्यक्षांनी याकडे दुर्लक्ष केले मात्र शासनाकडून आलेल्या करोडो रुपयांचा भ्रष्टाचार करून जनतेच्या पैशाची लूट केली. याबाबत माजी नगराध्यक्ष उपाध्यक्ष व नगरसेवक यांच्यावर गुन्हा सुद्धा दाखल झालेला आहे.
उल्लेखनीय ही की नगराध्यक्ष पदाकरिता अजय कदम हे भाजपा – ब.रि.ए.मं. युतिचे उम्मेदवार म्हणुन घोषित करण्यात यावे याकरिता ॲड. सुलेखाताई कुंभारे यांनी महाराष्ट्र राज्याचे महसुलमंत्री व नागपुर व अमरावती जिल्याचे पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शिष्टमंडळ सोबत भेटून विनंती केली आहे. अध्यक्षपदासाठी बरिएमं चे स्थानिक नेते अजय कदम यांचे नाव सार्वजनिक रित्या बरिएमं नेत्या सुलेखाताई कुंभारे यांनी आधीच जाहीर करुन भाजपवर आघाडी घेतली. भाजप कडुन अजय अग्रवाल हे इच्छुक असल्याचे समजते. महसुलमंत्री बावनकुळे ही अजय अग्रवाल यांना लढविण्यास उत्सुक आहेत. परंतु जनतेमध्ये अजय कदम यांच्या बद्दल जास्त पसंती दिसत आहे. केंद्रीय मंत्री नितिन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लोकसभा व विधानसभा निवडणुकीतील मतांचे गणित हे माजी राज्यमंत्री ॲड. सुलेखाताई कुंभारे यांच्या निर्णायक मतांवर अवलंबून असते. केंद्रीय मंत्री नितिन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विजयासाठी माजी राज्यमंत्री ॲड. सुलेखाताई कुंभारे यांचे महत्वपूर्ण योगदान बघता कामठी नगरपरिषद निवडणुकीत सुलेखाताई कुंभारे यांना भाजप चे वरिष्ठ नेते झुकते माप देऊ शकतात. तसेच बावनकुळेंची कामठी शहरात झालेली पीछेहाट बघता बावनकुळे यांना नगराध्यक्ष पदाचा हट्ट सोडावाच लागेल अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. त्यामुळे कामठी नगरपरिषद वर सत्तेचे गणित जुळवाजुळव करतांना अजय कदम यांनाच नगराध्यक्ष पदाचे भाजप बरिएमं युतीचे उमेदवार म्हणून घोषित करावे लागणार असेही बोलले जात आहे. रामटेक मध्ये भाजपा स्वबळावर लढणार आहे तर कामठी मध्ये बरिएमं सोबत युती करण्याशिवाय बावनकुळेंना पर्याय नाही. कामठीच्या विकासासाठी आलेला मंजुर निधी कामठीच्या मूलभूत सुविधा उभारण्यासाठीच वापरला गेला पाहिजे, कामठी शहराला स्मार्ट सिटी करण्यासाठी भारतीय जनता पार्टी व बहुजन रिपब्लिकन एकता मंच पूर्ण क्षमतेने व पूर्ण ताकतीने एक विजन घेऊन कामठी नगरपरिषद निवडणूक लढविणार आहे.
कामठीचा नगराध्यक्ष तसेच नगरसेवक हे भाजपा ब. रि. ए. मं. युतीचेच निवडून येतील असा ठाम विश्वास ॲड. सुलेखाताई कुंभारे यांनी व्यक्त केला आहे.


































