Vansh News Digital Web portal online services
पिंपरी चिंचवड (पुणे) : 24 आँक्टोबर 2025
नगरसेविका बनण्याचे स्वप्न बघणाऱ्या बायकोने तिच्या चारित्र्यावर संशय घेणाऱ्या नवऱ्याचा काल रात्री गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील पिंपरी चिंचवड येथे घडली. खुन करणाऱ्या आरोपी महिलेचे नाव आहे चैताली भोईर.. खुन झालेल्या सामाजिक कार्यकर्त्याचे नाव नकुल भाईर असल्याचे समजते. त्यांचा पिंपरी चिंचवड भागात त्यांचा मोठा जनसंपर्क होता. नकुल भोईर हे शरदचंद्र पवार गटाच्या राष्ट्रवादी आणि विविध सामाजिक चळवळीत सक्रिय होते. चिंचवडगाव आणि शहरातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी ते नेहमी पुढे असायचे. अशा सामाजिक कार्यकर्त्याचा मध्यरात्री अचानक खून झाल्याने स्थानिकांमध्ये खळबळ उडाली आहे.
पिंपरी चिंचवड शहरात पत्नीने पतीचा खून केल्याची घटना समोर आली आहे. पती सामाजिक कार्यकर्ता होता तर पत्नी आगामी महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक आहे. नकुल भोईर असं खून झालेल्या सामजिक कार्यकर्त्याच नाव आहे. नकुल भोईर हा पत्नीच्या चारित्र्यावर वारंवार संशय घेत असल्याची प्राथमिक माहिती आहे. काल सायंकाळी देखील दोघांत वाद झाला होता, रात्री देखील नकुलचा आणि पत्नीचा वाद झाला त्या वादात नकुलच्या पत्नीने ओढणीनं गळा दाबून हत्या केली. आरोपी पत्नीला चिंचवड पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नकुल भोईर हा पत्नी चैतालीच्या चारित्र्यावर सतत संशय घेत होता. यावरून त्यांच्यात अनेकदा वाद झाले. परंतु, शुक्रवारी पहाटे झालेल्या वादातून ही घटना घडली आहे. नकुल आणि चैताली यांच्यात वाद झाले. यातूनच प्रकृतीने भारदस्त असलेल्या चैतालीने ओढणीनं गळा दाबून हत्या केली. दोन आणि पाच वर्षांची मुलं आतील रूममध्ये झोपली होती. तेव्हा हा सर्व थरार बाहेरच्या रूममध्ये सुरू होता. नकुल आणि चैताली यांचा साडी सेंटरचा व्यवसाय होता. असं असताना नेहमीच्या वादातून आणि सतत चारित्र्यावर संशय घेतल्याने पत्नीने पतीची हत्या केली आहे. घटनेचा अधिक तपास चिंचवड पोलीस घेत आहेत.


























































