अजय कदम यांना मतदारांतून मिळणाऱ्या प्रचंड प्रतिसादामुळे भाजप हादरली
श्री. सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online
कामठी /नागपुर : 1 डिसेंबर 2025
कामठी नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत बहुजन रिपब्लिकन एकता मंचचे उमेदवार अजय कदम यांचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत असल्याने संपूर्ण कामठी शहरात या निवडणुकीची समीकरणे वेगाने बदलताना दिसत आहेत. सर्व समाजात, सर्व भागात, छोट्या ते मोठ्या गटांत अजय कदम यांचे नाव ठळकपणे उच्चारले जात असल्याने पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना अजय कदम च्या उमेदवारी चा चांगलाच धसका बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
या निवडणुकीच्या निमित्ताने मागील 15 वर्षापासुन सुरु असलेली भाजप बरिएमं महायुती तुटली. कधी एकमेकांचे मित्रपक्ष असलेल्या बरिएमं च्या नेत्या एवढ्या आक्रमक कधीच दिसल्या नाहीत. बावनकुळे यांच्या कथित विकासाच्या माँडेल चा फुगा सुलेखाताईं कुंभारे यांनी फोडुन टाकला. कामठी ला बावनकुळेंनी अनाथ केल्याचा आरोप सुलेखाताईं कुंभारे यांनी केला होता.
शहरात “अजय कदम, अजय कदम” हे नाव सर्वत्र सुरू असल्याचे लक्षात येताच पालकमंत्र्यांच्या नाराजीची चिन्हे उघड दिसू लागली असून, गेल्या काही दिवसांपासून त्यांनी या निवडणुकीत विविध पद्धती वापरून अजय कदम यांना पराभूत करण्याचा प्रयत्न केल्याचे आरोप होत आहेत. साम–दाम–दंड–भेद या सर्व राजकीय शस्त्रांचा वापर करूनसुद्धा मतदारांवर याचा काहीच परिणाम झाला नसून, उलट सर्व समाजातील मतदारांनी अजय कदम यांना मोठ्या मताधिक्याने विजय मिळवून देण्याचा निर्धार केल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे.
यामुळे कामठी नगराध्यक्ष निवडणूक ही पालकमंत्री बावनकुळे यांच्यासाठी मोठे राजकीय आव्हान ठरली आहे.
दरम्यान, बहुजन रिपब्लिकन एकता मंचच्या संयोजिका ॲड. सुलेखाताई कुंभारे यांनी, “भाजपतर्फे मोठ्या प्रमाणात बोगस मतदानाची तयारी तसेच पैशांचे सर्रास वाटप केल्याची गंभीर तक्रार बरिएमं तर्फे पोलिस आयुक्तांकडे दाखल केली असल्याचे समजते . परंतु, राजकीय दबावामुळे अद्याप यावर कोणतीच कारवाई झालेली नसल्याचा स्पष्ट आरोप कुंभारे यांनी केला.
कामठीतील जनता मात्र यावेळी विकासाला प्राधान्य देत असल्याने, अजय कदम यांच्या बाजूने प्रचंड लाट निर्माण झाल्याचे जाणकारांचे निरीक्षण आहे. परिणामी आगामी निकालात मोठी राजकीय उलथापालथ दिसून येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



































