श्री सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online
नागपुर : 29 आँक्टोबर 2025
नागपुरात प्रहारचे नेते माजी आमदार बच्चु कडु यांचा हजारो वाहन व शेतकऱ्यांच्या अभुतपुर्व गर्दीत महाएल्गार मोर्चा काल पोहोचला. शेतकऱ्यांची संपुर्ण कर्जमाफी घेतल्याशिवाय मी नागपुर सोडणार नाही अशी आंदोलकांनी भुमिका घेतली. त्यानंतर नागपूर वर्धा, नागपूर हैदराबाद महामार्गासह आऊटर रिंगरोड सर्वत्र जाम झाला. काल पासुन जवळपास 24 तास उलटले तरी जाम काही ओसरला नाही. आज दुपारी 12 वाजेपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमच्या मागण्यांवर निर्णय घ्यावा असाही अल्टीमेटम बच्चु कडु यांनी घेतला. परंतु राज्य सरकारने यांवर अजुनही निर्णय घेतला नाही. बच्चु कडु यांचे शी चर्चा करण्यासाठी नागपुर चे पालकमंत्री तथा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे व राज्यमंत्री अँड. आशिष जयस्वाल येणार असेही सांगितले जात होते. परंतु त्या नंतर रेल रोको करिता आंदोलक रेल्वे मार्गावर पोहोचले होते.
जिवनावश्यक वस्तु, भाजीपाला दुध आणि औषधांच्या गाड्या या चक्का जाम मध्ये अडकुन बसल्याने काही मंडळी राज्य सरकारच्या इशाऱ्यावर मुंबई हायकोर्टाच्या नागपुर खंडपीठात गेले असल्याची चर्चा सुरू झाली. यांवर जनतेस वेठीस धरु नका. जनतेला त्रास होईल असे क्रृत्य न करता प्रवाशांना महामार्ग मोकळा करावा याकरिता नागपुर खंडपीठाने बच्चु कडु यांना आदेश दिल्याची सुत्रांकडुन माहिती मिळत आहे. बच्चू कडूंसह शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे.मागील 24 तासापासून जनजीवन विस्कळीत झाले आहे. नागपुर ठप्प झाले आहे. ना बच्चु कडु माघार घ्यायला तयार आहे. ना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे राज्य सरकार यांवर तयार आहे.
या आंदोलनावर नागपूर खंडपीठाने आता आदेश दिला आहे की, सायंकाळी सहा वाजेपर्यंत आंदोलनस्थळ सोडा असे आदेशात सांगण्यात आलं आहे.आता बच्चु कडु काय भुमिका घेतात याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.



































