श्री.सुनील उत्तमराव साळवे
(9637661378)
मुख्य संपादक
VANSH NEWS Digital media services.
कोराडी /नागपूर : 9 आँगस्ट 2025.
नागपूर जिल्ह्यातील कोराडी येथील श्री महालक्ष्मी जगदंबा देवस्थान परिसरात आज रात्री 8:30 च्या सुमारास मोठी दुर्घटना झाल्याची माहिती पुढे येत असुन या दुर्घटनेत 30 – 35 कामगार गंभीररित्या जख्मी झाल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.





श्री. महालक्ष्मी जगदंबा देवस्थान कोराडी मंदिरात परिसरात निर्माणाधीन गेट पडल्याची दुर्घटना घडली. प्राप्त माहितीनुसार जवळपास 30- 35 कामगार याठिकाणी काम करीत होते. त्यापैकी 9 जण दुर्घटनेतुन काढले असुन त्यांना जवळच्या नंदिनी हाँस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अजुनही काही लोक दबले आहेत असेही बोलले जात आहे. या परिसरात NMRDA च्या माध्यमातून बांधकाम सुरू आहे. त्यांनी BBG कंपनीला हे कन्स्ट्रक्शन्स चे काम दिले असल्याची माहिती असुन अत्यंत निक्रृष्ट दर्जाचे काम व निष्काळजीपणा झाला असेही बोलले जात आहे. घटनास्थळी नागपुर जिल्हाधिकारी विपिन इटनकर, DCP निकेतन कदम, कोराडी व कामठी पोलीस तसेच NDRF ची टीम पोहोचली आहे. प्राप्त माहितीनुसार 15 जख्मी कामगारांना नागपुरच्या मैक्स (एलेक्सिस) हाँस्पिटल मध्ये तर कोराडी येथील नंदिनी हाँस्पिटल मध्ये 9 कामगार व काही GM हाँस्पिटल मध्ये दाखल करण्यात आल्याची सुत्रांकडुन माहिती मिळत आहे. यातील गंभीर जखमींना वेगवेगळ्या दवाखान्यात भर्ती केले असुन त्यांची अजुनही जख्मी कामगारांची पुर्ण माहिती मिळत नाही. घटनास्थळी सुरक्षिततेचा अभाव दिसला. सेफ्टी प्रिकाऊशनं घेतले गेले नाही. श्री महालक्ष्मी जगदंबा देवस्थान ट्रस्ट चा भोंगळ कारभार समोर आला आहे.
श्री महालक्ष्मी जगदंबा देवस्थान झालेल्या दुर्घटनेची माहिती मिळताच माजी राज्यमंत्री सुलेखाताई कुंभारे, माजी मंत्री सुनील केदार., माजी सभापती प्रा.अवंतिका लेकुरवाळे, माजी सभापती दिशा चनकापुरे ह्या सुद्धा घटनास्थळी पोहोचले असुन दुर्घटनची माहिती जिल्हाधिकारी विपिन इटनकर यांचेकडून घेतली तथा आवश्यक त्या उपाययोजना रेस्क्यु आप्रेशन साठी कराव्यात तसेच दुर्दंघटनेत जखमींवर योग्य उपचार करावेत अशा सुचना त्यांनी दिल्या. श्री महालक्ष्मी जगदंबा देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष सध्या चंद्रशेखर बावनकुळे आहेत. ते राज्याचे महसूलमंत्री असल्याने त्यांचे राज्यभर दौरे सुरू असतात त्यामुळे वेळेच्म अभावी त्यांचे महालक्ष्मी जगदंबा देवस्थानातील निर्माण कार्याच्या क्वालिटी व सुरक्षिततेवर दुर्लक्ष झाले असावे अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. कोराडी महालक्ष्मी जगदंबा देवस्थान ट्रस्ट चा या दुर्घटनेशी संबंध नाही असे जरी महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सोशल मीडिया च्या वतीने जरी सांगण्यात येत असले तरी नागपुर जिल्याचे पालकमंत्री व श्री महालक्ष्मी जगदंबा देवस्थान कोराडी ट्रस्ट चे अध्यक्ष या नात्याने जबाबदारी झटकून चालणार नाही. त्यामुळे संबधित दोषी NMRDA अधिकारी BBG कंपनी यांचेवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी माजी नगरसेवक रत्नदीप रंगारी यांनी केली आहे.
Devendra Fadnavis
Sunil Chattrapal Kedar
Adv. Ashish Jaiswal
Dr. Ashishrao R. Deshmukh
Uddhav Thackeray
Nana Patole
Sanjay Raut
Chandrashekhar Bawankule
Shyamkumar Barve
Vijay Wadettiwar
Nitin Gadkari
Sulekha Kumbhare


































