केंद्रीय मंत्री किरण रिजीजु व गजेंद्र सिंह शेखावत यांनी भारत सरकारकडुन दिले भंतेजी संघसेना व माजी मंत्री सुलेखा कुंभारे यांना सकारात्मक आश्वासन
श्री.सुनील उत्तमराव साळवे
(9637661378)
मुख्य संपादक
Vansh News Digital Portal media services.
कामठी/नागपुर : 13 आँगस्ट 2025
जगातील श्रध्दास्थान असलेले बुध्दगया येथील महाबोधी महाविहार या ठिकाणी गेल्या 20 वर्षा पासुन आंतरराष्ट्रीय त्रिपिटक चॅंटींग च्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते. या वर्षी हा कार्यक्रम भारतातील अनेक संघटनांच्या वतीने व भारत सरकार च्या पुढाकाराने दि. 2 डिसेंबर ते 12 डिसेंबर 2025 पर्यंत महाबोधी महाविहार या ठिकाणी घेण्यात येणार आहे.



या कार्यक्रमात जवळपास 26 देशातील बौद्ध राष्ट्राचे प्रतिनिधी व 12 हजारहुन अधिक भारतातील प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. या निमित्ताने काल दि. 12 आँगस्ट 2025 रोजी दिल्ली येथे पुज्य भंतेजी संघसेना यांच्या नेतृत्वात ॲड. सुलेखाताई कुंभारे, आनंद जैन व रंजन कुमार यांनी केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेण रिजीजु यांची भेट घेवून निवेदन सादर केले. तसेच भारत सरकार चे सांस्कृतिक व पर्यटक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांना सुध्दा निवेदन दिली, भारत सरकार च्या वतीने अंतरराष्ट्रीय त्रिपिटक चॅंटींग च्या कार्यक्रमाला सकारात्मक सहकार्य करण्याचे आश्वासन दोन्ही मंत्री महोदयांनी दिले. त्या बद्दल पुज्य भंतेजी संघसेना व ॲड. सुलेखाताई कुंभारे यांनी दोन्ही मंत्री महोदयांचे आभार मानले.
प्रसिध्दी प्रमुख सुशिल तायडे यांनी ही माहिती एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

































