श्री. सुनील उत्तमराव साळवे
(9637661378)
मुख्य संपादक
Vansh News digital webortal
नागपूर : 2 जुन 2025
नागपूर जिल्ह्यात सुनील केदार आणि भाजपचे कट्टर वैर आहे. लोकसभेच्या निवडणुकीत केदारांनी भाजपला उघड चॅलेंज केले होते. त्यांनी काँग्रेसचा खासदार निवडूनसुद्धा आणाला. त्यामुळे आपसातील वैर अधिकच वाढले होते. त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीत मात्र भाजपने केदारांना मोठा पराभवाचा धक्का दिला.अशातच भाजप चे माजी आमदार टेकचंद सावरकर यांनी केदार गटाशी युती करीत मौदा तालुका शेतकी खरेदी विक्री संस्थेच्या निवडणुकीत संपुर्ण पैनल निवडुन आणले! नुकत्याच झालेल्या या निवडणुकीत भाजप आ. टेकचंद सावरकर यांनी भाजप चे दोन उमेदवार निवडून आणले. भाजप व काँग्रेस चे सहकार एकता पैनल सत्तेवर निवडुन आले. सध्या कांग्रेस नेतेही भाजप नेत्यांविरुद्ध बोलत नाहीत. काहीनीप तर भाजप नेत्यांसोबत जुळवून घेतले. त्यामुळे जमिनीवरचा कांग्रैस कार्यकर्ता अडचणित आहे. भाजपचे माजी आमदार टेकचंद सावकर हे ही उपेक्षित असल्याचे समजते. त्यांना हवा तसा मानसन्मान भाजपमध्ये मिळत नसल्याचे ही समजते. त्यामुळे ही कदाचित सावरकर यांनी कांग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेतला असावा. त्यांची कांग्रेस नेते देवेंद्र गोडबोले, राजाभाऊ तिडके, आणि खा. शाममकुमार बर्वे यांचेशी सध्या वाढलेली जवळीक भाजप हा डोकेदुखी ठरु शकते. कारण एखाद्या मोठ्या वटव्रृक्षाखाली छोटेछोटे रोपटे वाढु शकत नाही. त्यामुळे भविष्यात माजी आमदार टेकचंद सावकर हे कदाचित वेगळा निर्णय ही घेऊ शकतात अशी राजकीय गोटात चर्चा ऐकण्यात येत आहे.


राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नागपूर जिल्हा ग्रामीण अध्यक्ष शिवराज बाबा गुजर यांचे पैनलचा दारुण पराभव या निवडणुकीत झाला. महायुतीचा युती धर्म भाजप ने पाळला नसल्याची गुजर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना तक्रार केल्याचे समजते.
नागपूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचे केदारांचे नागपूर ग्रामीणमधील वर्चस्व कमी करण्याचे मुख्यमंत्री फडणवीस व पालकमंत्री बावनकुळेंचे प्रयत्न सुरू असताना भाजपच्याच एका नेत्याने कांग्रेस सोबत युती केल्याने अनेकांना धक्का बसला आहे. विशेष म्हणजे महाविकास आघाडीचे सरकार असताना तत्कालीन भाजपचे आमदार टेकचंद सावकर यांनी केदारांच्या विरोधात अनेक तक्रारी केल्या होत्या..
काँग्रेस नेते व माजी मंत्री सुनील केदार आणि भाजपचे माजी आमदार टेकचंद सावकर यांच्या पॅनेलचे सर्व 13 उमेदवार निवडून आले आहेत. एक उमेदवार आधीच बिनविरोध निवडून आला होता.
नागपुर जिल्ह्य़ातील सहकार क्षेत्रातील बाजार समिती निवडणुकींचा मागील 30 वर्षाचा इतिहास बघितला तर केदार गटाने भाजपसोबत याआधी ही एकत्रित निवडणुका लढल्या होत्या. भाजप नेते नितीन गडकरी, सहकार नेते स्वर्गवासी बाबासाहेब केदार यांचेतील जवळीक सर्वांना परिचित आहे. आगामी नागपुर जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या कांग्रेस कार्यकर्ता भांबावलेले आहेत.एकीकडे नागपुर ग्रामीण कांग्रेस ला गळती लागली असतांना भाजप नेत्यांसोबत माजी मंत्री केदार, खा. शामकुमार बर्वे यांची होणारी अभद्र युती आता कार्यकर्त्यांना बुचकळ्यात टाकत आहे.
