श्री सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online
काटोल : 26 नोव्हेंबर 2025
अवैध रित्या अंमलीपदार्थ गांजाची विक्री प्रकरणात नागपुर जिल्ह्यातील काटोल तालुक्यात असलेल्या डोरली (भां) मुकनी येथील भाजप चे सरपंच वैभव काळे यांस त्याच्या साथीदारांसह काटोल पोलिसांनी अटक केली आहे. काटोलच्या कर्तव्यदक्ष पोलिस अधिकाऱ्यांना गुप्त सुचनेच्या आधारे एका चार चाकी वाहनात जवळपास 33. 600 किलो अवैध गांजा पकडला .
सध्या नागपुर जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत. आदर्श आचारसंहिताचे पालन प्रत्येक राजकीय पक्षाने करावे अशा निवडणुक आयोगाच्या सुचना आहेत. परंतु काटोल मध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात गांजा आला कसा? कुठुन आला? याची चौकशी सुरू असुन याप्रकरणी जवळपास 5-6 जणांना काटोल पोलिसांनी ताब्यात घेतले असुन त्यांची सखोल चौकशी वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असल्याची चर्चा सुरू आहे. या प्रकरणात भाजप सरपंच वैभव दिलीप काळे व त्याच्या 5-6 साथीदारांना ताब्यात घेतल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली.
यासंदर्भात पोलिसांच्या ताब्यात असलेल्या भाजप सरपंच व त्याच्या साथीदारांविरुद्ध FIR नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे. अशी माहिती खात्रीलायक सुत्रांनी दिली.एवढ्या मोठ्या प्रमाणात अवैध गांजा काटोल शहरात विक्री करुन नशेच्या आहारी घालण्याचा त्या कथित भाजप सरपंचा चा उद्देश तर नव्हता ना? त्या कथित भाजप सरपंच व त्याचा आका पर्यंत काटोल चे पोलीस अधिकारी नक्की पोहोचुन या प्रकरणाचा छडा लावतील ही आशा आहे. आरोपी भाजप सरपंच वैभव काळे हा काटोल चे भाजप आमदार यांचा जवळचा कार्यकर्ता ओळखला जातो.

अवैध रित्या अंमलीपदार्थ गांजाची विक्री साठी साठवणुक करणाऱ्या आरोपीतांविरूध्द गुन्हा नोंद, 33.600 किलो गांजा जप्त
पोलीस स्टेशन काटोल
नागपुर ग्रामीण पोलीसांची कामगिरी दिनांक 25/11/2025 रोजी अंमली पदार्थ विरोधी कारवाई पथक पेट्रोलींग करीत असतांना त्यांना गुप्त बातमीदाराने खात्रीशीर माहीती दिली की, इसमे नामे समीर राउत याने काटोल शहरातील चांडक ले आउट वार्ड क्र. 7 मध्ये, गणेश मंदिर जवळ घरमालक नामे रमेशराव गजभिये यांचे घरी किरायाने घेतलेल्या रुममध्ये गांजा या अंमली पदार्थाची साठवणुक करुन ठेवलेली आहे. नमुद पथकाने सदर माहीती काटोल पोलीसांना देत मिळालेल्या महीतीच्या आधारे संयुक्तरित्या कारवाई करत घटनास्थळी जावुन पाहणी केली असता आरोपी नामे 1) समीर विजयराव राउत, वय 24 वर्षे, धंदा. व्यापार रा. दातेवाडी ता. नरखेड जि. नागपुर हा मिळुन आला त्याला अधिक विचारपुस केली असता सदर खोली आपण नाराळाच्या व्यापारासाठी किरायाने घेतली असल्याचे सांगितले. घटनास्थळी आरोपी 2) सचिन भागवत झोड वय 22 वर्षे धंदा- मजुरी रा. डोर्ली भांडवलकर ता. काटोल जि. नागपुर व 3) छगन प्रितम चरपे वय 23 वर्षे धंदा- मजुरी रा. दातेवाडी ता. नरखेड जि.नागपुर हे सुध्दा मिळुन आले. नमुद खोलीची झडती घेतली असता आरोपीच्या घरात गांजा सदृश्य पदार्थ मिळुन आला. नमुद आरोपीतांकडे गांजा कोठुन आणला याबाबत अधिक चौकशी केली असता अशी माहीती प्राप्त झाली की, आरोपी आरोपी क्रं 1) समीर विजयराव राउत आणि 2) वैभव दिलीपराव काळे, रा. डोर्ली अशांचे सांगणेवरुन आणि पैसे पुरविले वरून 3) छगन प्रितम चरपे रा. दातेवाडी ता. नरखेड, 4 ) सचिन भागवत झोड रा. डोर्ली ता. काटोल, 5) सुरज बाबराव सुपटकर, रा. दातेवाडी ता. नरखेड, 6) विशाल देविदास शेभेंकर, रा. मेंढला ता. नरखेड अशांनी महेंद्रा बोलेरा पिक-अप वाहन क्र एम एच 40 डीसी 0093 ने बालंगीर, उडिसा येथुन आणल्याची माहीती प्राप्त झाली. पोलीसांनी पंचासमक्ष 33.600 किलो ग्रॅम गांजा (किंमत 6,72000 /- रूपये) , 3 अँड्राईड मोबाईल, महेंद्रा बोलेरो पिकअप मालवाहू वाहन क्र. एम एच 40 डी.सी 0093 आणि इतर साहीत्य असा एकुण 17,17000 /- रूपयांचा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त केला. नमुद आरोपीच्या विरूध्द पोलीस स्टेशन काटोल येथे एन.डि.पि.एस. अँक्ट कलम 8 (क), 20 (ब) (ii) (क), 22, 29 अन्वये कायदयान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपींना अटक प्रक्रिया सुरू आहे.


































