श्री सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online
बिहार: 15 नोव्हेंबर 2025
नुकत्याच बिहार विधानसभा निवडणुकीत 89 जागांसह जिंकत भाजप सर्वात मोठा राजकीय पक्ष ठरला आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर त्यांचा मित्र पक्ष जेडीयू आहे. भाजपला बिहारमध्ये एकहाती सत्ता मिळवायची आहे. गेल्या दोन वेळेपासून भाजपला तडजोड करावी लागत आहे. गेल्यावेळी चांगल्या जागा हाती असतानाही भाजपने नितीश कुमार यांच्यासाठी मन मोठे केलं होतं. पण यावेळी भाजपचे सुर बदलले आहे. केंद्रातील प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या NDA सरकारला नितीशकुमार यांच्या जनता दल युनायटेड (जेडीयू) चा पाठिंबा आहे. बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकल्याने भाजप नेते बिहारमध्ये स्वतःचा मुख्यमंत्री बनवण्यासाठी प्रयत्नशील आहे. परंतु भाजप नितीशकुमार यांना परत एकदा मुख्यमंत्री बनु देण्याच्या मनःस्थितीत दिसत नाही.
पण नितीश कुमार यांना हलक्यात घेणे भाजपला कठीण जाण्याची शक्यता आहे. नितीश कुमार 10 व्या वेळा मुख्यमंत्री पदी विराजमान होऊ शकतात. नितीश कुमार यांनी मनात आणले तर भाजपविना सुद्धा ते सहज सरकार तयार करू शकतात.
NDA ला बहुमत मिळाले आहे. या महायुतीने एकूण 202 जागांवर विजय मिळवला आहे. त्यात भाजपला सर्वाधिक 89 जागांवर विजय मिळाला. तर नितीश कुमार यांच्या जेडीयूला 85 जागा मिलाल्या. चिराग पासवान यांच्या LJP(RV) या पक्षाने 19 जागांवर तर “हम” या पक्षाला 5 जागांवर विजय मिळाला आहे.
नितीश कुमार यांना भाजपने यापूर्वी पलटू चाचा नावाने डिवचले आहे. यापूर्वी त्यांनी भाजपची साथ सोडून बिहारमध्ये सत्तेचा प्रयोग केला आहे. त्यामुळे नितीश कुमार यांच्यासोबत जाणे ही भाजपची सध्याची गरज असली तरी नितीश कुमार यांना भाजपची गरज आहेच, असे नाही. 243 सदस्यांच्या बिहार विधानसभेत बहुमतासाठी 122 जागांची गरज आहे. हा मॅजिक फिगर गाठण्यासाठी नितीश कुमार यांना काही तडजोडी कराव्या लागतील.
नितीश कुमार यांच्या जेडीयू पक्षाला 85 जागा मिळाल्या आहेत. बिहारमध्ये त्यांना सरकार तयार करण्यासाठी 37 जागांची गरज आहे. काँग्रेस, आरजेडी आणि एमआयएमसह इतर एक आकडी आमदारांना स्वतःकडे वळविण्यात जर ते यशस्वी ठरले तर बिहारमध्ये बिगर भाजपचे सरकार अस्तित्वात येऊ शकते.
विरोधी पक्ष एकत्र आल्यास भाजप विरोधी बाकड्यावर
आरजेडी 25
काँग्रेस 06
डावे पक्ष 03
AIMIM 05
आयपी गुप्ता 01
एकूण 45
नितीश कुमार यांना बहुमतासाठी केवळ 37 आमदारांचा पाठिंबा आवश्यक आहे. तर हे विरोधक एकत्र आल्यास हा आकडा 45 इतका होतो. नितीश कुमार हे विना भाजप सरकार स्थापन करू शकतात




































