श्री सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online
पारशिवनी : 15 नोव्हेंबर 2025
नागपूर जिल्ह्य़ातील रामटेक विधानसभेतील पारशिवनी येथील कांग्रेस पक्षातील कट्टर केदार समर्थक माजी सरपंच प्रकाश डोमकी यांनी काल राज्यमंत्री अँड. आशिष जयस्वाल यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना (शिंदे) पक्षात प्रवेश केला. पारशिवनी नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकीकडे प्रकाश डोमकी यांच्या पत्नी सुनिता डोमकी यांची कांग्रेस मध्ये उमेदवारी निश्चित होणार असतांना त्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केल्याने कांग्रेसचे माजी मंत्री सुनील केदार, तसेच राजेंद्र मुळक यांना मोठा झटका समजला जातो.
सध्या कांग्रेसची सर्वत्र पीछेहाट आहे. कांग्रेसचे चे अनेक पदाधिकारी हे भाजपा मध्ये गेले.याआधी कांग्रेसचे माजी उपसभापती गज्जु यादव, माजी जिल्हा परिषद सदस्य दुधराम सव्वालाखे यांनी भाजप मध्ये प्रवेश केला आहे. भाजप मध्ये वाढलेली गर्दी लक्षात घेता माजी सरपंच प्रकाश डोमकी यांनी भाजप मध्ये प्रवेश न घेता राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांच्या शिवसेना पक्षात प्रवेश केला.



पारशिवनीचे माजी सरपंच प्रकाश डोमकी यांनी त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसह आज शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल म्हणाले की, प्रकाश डोमकी आणि माझे अनेक वर्षांचे अत्यंत मैत्रीपूर्ण संबंध आहेत. राजकीय विचारधारा वेगळी असूनही आम्ही कधीही जनतेच्या विकासात राजकारण आड येऊ दिले नाही.
आज त्यांनी शिवसेनेत प्रवेश करून जनतेच्या सेवेसाठी सज्ज होण्याचा त्यांनी घेतलेला निर्णय हे पारशिवनी भागासाठी नक्कीच एक सकारात्मक आणि बळकटी देणारे पाऊल आहे. या निमित्ताने मी शब्द देतो की पारशिवनी परिसरातील प्रत्येक नागरिकाच्या कल्याणासाठी मी सतत झटत राहीन. आपणा सर्वांच्या सहकार्याने पक्ष अधिक भक्कम करू आणि जनसेवा अधिक प्रभावीपणे करु!असा आत्मविश्वास राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी व्यक्त केला.
प्रकाश डोमकी यांचे सोबत नरेश पालीवाल, अनिकेत कभे, सुरेश भिवगडे, मधुकर लोणकर, भागवत रंधई, सुरेश घोडमारे, मुरलीधर येरखेडे, गणेश मोरे, अरुण राऊत, प्रमोद डोमकी, मनोज डोमकी, मधुकर बालपांडे, माणिक मेश्राम, मनीष महाजन, उमा कापसे, मधुकर कुहीटे, राहुल डोमकी, अक्षय बिसन, विकास खंडाते, सुभाष खंडाते, पप्पू केळवदे, बादल बिसन, धर्मा गवते, अरुण राऊत, हितेश नाखले, हिमांशु चौके, वैभव सोनकुसरे, तेजस पांडे, संकेत कुहीटे, आयुष गाते, मयूर बुरबांदे, पंकज देव्हारे, समीर मेश्राम, सागर बावणे, प्रज्वल कठाने, हितेश डोमकी, बाळा खंडाते, सुरेश भिवगडे, नेहाल सावजी, हिमांशु चौधरी, सोहम राजूरकर, वासुदेव कठाने आणि सागर बिसेन यांनी प्रवेश घेतला.
याप्रसंगी शिवसेना उपजिल्हा प्रमुख वर्धराज पिल्ले, दिपक शिवरकर, हर्षवर्धन निकोसे, राजेश गोमकाळे, राहुल ढगे, रोशन पिंपरामुळे, प्रमोद काकळे व सौरभ वाळके,विजय भुते उपस्थित होते.
सध्या रामटेक, कन्हान पिंपरी नगरपरिषद तसेच पारशिवनी, कांद्री नगरपंचायत निवडणुकीत भाजप ची एकला चलो ची भुमिका असुन भाजपने स्वबळावरच निवडणुका लढवाव्या अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे. त्यामुळे रामटेक विधानसभेत शिवसेना शिंदे पक्ष सुद्धा स्वबळावरच निवडणुक लढणार असल्याचे दिसून येते. याठिकाणी शिवसेना शिंदे पक्षाचे राज्यमंत्री अँड. आशिष जयस्वाल व विधानपरिषद आमदार क्रृपाल तुमाने सातत्याने पक्षांतर्गत सभा बैठका घेत असुन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्याच्या तयारीत दिसत आहेत.
इकडे पारशिवनी नगरपंचायत निवडणुकीत डोमकी यांच्या शिवसेना शिंदे पक्षात प्रवेशामुळे भाजप उमेदवारात नाराजी दिसत आहे. नगराध्यक्ष पदासाठी भाजप शिवसेना आमनेसामने येण्याची दाट शक्यता आहे.



































