श्री.सुनील उत्तमराव साळवे
(9637661378)
मुख्य संपादक
Vansh News Digital Portal media services.
नागपूर 28 जुलै 2025
काल नागपुरातील लष्करीबाग येथे स्व. भानुताई गडकरी मेमोरियल डायग्नोस्टिक सेंटरचे मोठ्या हर्षोल्लासात उद्घाटन संपन्न झाले. गोरगरिबांना अतिशय माफक दरात उच्चस्तरीय आरोग्य तपासण्या व आरोग्य सुविधा या हाँस्पिटल च्या माध्यमातून मिळणार आहेत.
काल झालेल्या उद्घाटन सोहळ्यात बोलतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “आरोग्याच्या क्षेत्रात सेवेसोबतच संवेदनेलाही तेवढेच महत्त्व आहे. नितीनजींकडे सेवा आणि संवेदना या दोन्ही गोष्टी आहेत. त्यामुळेच आईच्या नावाने डायग्नोस्टिक सेंटर सुरू करून गरिबांची सेवा करण्याचा विचार त्यांनी केला आणि तो प्रत्यक्षातही उतरवला. हे केंद्र आरोग्य सेवेच्या क्षेत्रात मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
लष्करीबाग येथील कमाल चौकात स्व. भानुताई गडकरी ग्रामीण विकास संस्थेद्वारा संचालित स्व. भानुताई गडकरी मोमोरियल डायग्नोस्टिक सेंटरचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी अध्यक्षस्थानी होते.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी याप्रसंगी म्हणाले की, गरिबांप्रति त्यांच्या आईंची असलेली संवेदना व त्यांच्या आशिर्वाद व संस्कारामुळे मी माझ्या जीवनात सर्व काही चांगले कार्य करु शकलो. प्रतिकुल परिस्थितीत ही माझी आई समाजसेवा करीत राहिली. त्या नेहमी म्हणायच्या कि तुम्ही जेवढे गरिबांसाठी कराल त्यापेक्षा जास्त तुम्हाला देव देईल. त्यांनी म्हटलेले सर्व काही माझ्या जीवनात सिद्ध झाले. राजकारणाचा अर्थ पाँवर पालिटिक्स नसुन राजकारणाचा अर्थ समाजकारण, राष्ट्रकारण, धर्मकारण आणि विकासकारण आहे. शिक्षण व आरोग्य क्षेत्रात सेवा करणे म्हणजे च राजकारण आणि असा मी माझ्या सहकाऱ्यांना सल्ला देतो. याप्रसंगी मी सांगु इच्छितो की, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मानक असलेल्या मशिन्स द्वारे शेतकरी गरीबांना आरोगा सुविधा मिळतील ज्यामध्ये MRI फक्त 1200/-रुपये, CTSCAN – 800/-रुपये, डायलेसिस सेवा 700/-रुपये जर महानगरपालिका कडुन आल्यास 250/-रुपयात डायलेसिस करणार. डिजिटल Xray फक्त 100 रुपयात करणार. 300/-रुपयांत 40 प्रकारच्या पैथालाँजी टेस्ट या हाँस्पिटल च्या माध्यमातून मिळतील असेही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले.


याप्रसंगी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळं स्व. भानुताई गडकरी ग्रामीण विकास संस्थेच्या अध्यक्ष सौ. कांचन गडकरी, राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमात बंगळुरू येथील महाबोधी सोसायटीचे जनरल सेक्रेटरी भंते आनंद थेरा, नागपूर येथील रामकृष्ण मठाचे अध्यक्ष राघवेंद्र स्वामी, माजी राज्यमंत्री सुलेखाताई कुंभारे,संघाचे राजेश लोया, विशाखापट्टणम येथील एएमटीझेडचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. जितेंद्र शर्मा, भाजपचे नागपूर शहर अध्यक्ष दयाशंकर तिवारी, आमदार संदीप जोशी, आमदार प्रवीण दटके, आमदार आशीष देशमुख, माजी खासदार डॉ. विकास महात्मे, माजी आमदार गिरीश व्यास, माजी आमदार टेकचंद सावरकर यांचीही प्रमुख उपस्थिती होती.



































