भाजप चे माजी नगराध्यक्ष,माजी नगरसेवक यांना उमेदवारी नाकारुन नविन चेहऱ्यांना दिली भाजप नेते बावनकुळेंनी संधी
श्री सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online
महादुला नगरपंचायत /नागपुर: 20 नोव्हेंबर 2025
नागपूर जिल्ह्य़ातील कामठी विधानसभेतील विद्यमान भाजप आमदार तथा राज्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या ग्रृहक्षेत्र असलेल्या महादुला नगरपंचायत निवडणुकीत विद्यमान भाजप चे नगराध्यक्ष,नगरसेवक या सर्वांना उमेदवारी नाकारली आणि नवख्या लोकांना उमेदवारी दिल्याने भाजप अंतर्गत नाराजी व खदखद दिसुन येत आहे. भाजपच्या नगरसेवकांना उमेदवारी न दिल्याने काहींनी तर उघड उघड बंडखोरी करीत अपक्ष अर्ज दाखल केला तर काहींनी ऐनवेळी एकनाथ शिंदे यांचे धनुष्यबाण हाती घेतले. त्यामुळे एरव्ही शिस्तबद्ध समजल्या जाणाऱ्या भाजप पक्षात बंडखोरी वाढली आहे की भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचेकडुनच विरोधी पक्षांच्या उमेदवारांचे मत विभाजन करण्यासाठी वेगळी खेळी तर नाही ना? अशी चर्चा आज जनतेत सुरु आहे.एवढी मोठ्या प्रमाणात बंडखोरी असुन देखील जर भाजपने परत तिसऱ्यांदा हैटट्रीक आणल्यास हे जगातील आठवे आश्चर्य जनता समजेल.
महादुला नगरपंचायत निवडणुकीकरिता सर्वसाधारण महिला पद हे नगराध्यक्ष पदासाठी असल्याने माजी नगराध्यक्ष राजेश रंगारी,यांच्या पत्नी दर्शना रंगारी यांना उमेदवारी मिळेल अशी चर्चा होती.राजेश रंगारी हे मागील 10 वर्षापासुन महादुला नगरपंचायत येथे उपाध्यक्ष, नगराध्यक्ष सुद्धा राहिले. यावेळी कांग्रेस कडुन माजी नगरसेवक रत्नदीप रंगारी यांच्या पत्नी सुषमा रंगारी यांना उमेदवारी जाहीर झाली तर भाजप कडुन शेवटच्या क्षणाला माजी नगराध्यक्ष राजेश रंगारी यांच्या पत्नीलाच उमेदवारी मिळणार अशी जनतेत चर्चा होती. 2019 सारखा पुन्हा दोन्ही रंगारी यांच्यातच होईल असा कयास असतांना 17 तारखेला दुपारी 2 वाजता भाजप कडुन हेमलता मनोज सावजी यांना भाजप कडुन पक्षाची उमेदवारी दिली असे भाजप चे युवा नेते संकेत बावनकुळे यांनी सांगितले पण सर्वसाधारण पदासाठी महिला राखीव पदासाठी नलिनी धुडस (माजी नगरसेविका) ह्या आग्रही असतांनाही त्यांना ही उमेदवारी नाकारली नलिनी धुडस ह्या 2014 ला माजी नगरसेविका होत्या. भाजप च्या माजी ग्रा. पं सदस्य ताराबाई रहांगडाले यांनी शिवसेना (शिंदे गटातुन) उमेदवारी दाखल केली. भाजप चे सुनील कुरील यांच्या पत्नी मिनाक्षी कुरील यांनी सुद्धा नगराध्यक्ष पदासाठी अपक्ष उमेदवारी दाखल केली.
प्रभाग क्रमांक. 1 मधुन भाजप चे नगरसेवक धनंजय भालेराव यांचा प्रभाग सर्वसाधारण महिला राखीव झाला इथे मागील 20 वर्षापासुन भाजप साठी कार्यरत धनंजय भालेराव यांच्या पत्नी ला उमेदवारी नाकारली. त्यामुळे इथे धनंजय भालेराव यांच्या पत्नी सोनु धनंजय भालेराव यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली. इथे भाजप ने नवीन चेहरा स्वाती ज्ञानेश्वर लांडे यांना उमेदवारी दिली.इथे भाजप चे रत्नाकर फाये यांच्या पत्नी कलाताई फाये ह्या सुद्धा अपक्ष रिंगणात उतरल्या आहेत.
प्रभाग क्रमांक 2 ओबीसी साठी राखीव आहे. इथे भाजप ने माजी नगरसेवक स्वप्नील थोटे यांना उमेदवारी नाकारली. इथे अध्यात्मिक कार्य करणारे पिढीजात भाजप चे जेष्ठ कार्यकर्ते प्रकाश भालेराव जे सेवा सहकारी सोसायटी चे अध्यक्ष आहेत तसेच जेष्ठ नागरिक आघाडीचे अध्यक्ष सुद्धा आहेत त्यांनी पक्षाला उमेदवारी मागितली होती. पण पक्षाने त्यांना सुद्धा संधी नाकारली. इथे भाजप चे युवा कांन्टैक्टर अभिजीत ढेंगरे यांना पक्षाने उमेदवारी दिली. त्यामुळे इथे सुद्धा भाजप च्या अन्य गोटात नाराजी दिसली. प्रभाग क्रमांक 2 मधुन माजी नगरसेवक धनंजय भालेराव यांनी सुद्धा अपक्ष उमेदवारी दाखल केली.
प्रभाग क्र. 3 मध्ये भाजपने निशांत पखिड्डे यांच्या पत्नी ट्विंकल निशांत पखिड्डे यांना उमेदवारी दिली. भाजप चे कांन्टैक्टर राहुल बागडे यांच्या पत्नीने उमेदवारी मागितली पण त्यांना भाजप ने उमेदवारी न दिल्याने आकांक्षा राहुल बागडे यांनी भाजप सोडुन शिवसेनाचे धनुष्य बाण हाती धरले आहे.
प्रभाग क्रमांक 4 मध्ये भाजपा मध्ये बंडखोरी झाली नाही. इथे भाजप च्या नंदा तुरक यांना उमेदवारी मिळाली.
प्रभाग क्रमांक. 5 मध्ये भाजपा ने अजय सोलंकी नामक नविन उमेदवार दिला. इथे भाजप चे चंद्रप्रकाश आगासे यांनी बंड पुकारत अपक्ष उमेदवारी दाखल केली तर भाजप चे अक्षय रहांगडाले यांनी सुद्धा भाजप कडुन उमेदवारी न मिळाल्याने शिवसेना (शिंदे गट) कडुन उमेदवारी दाखल केली.
प्रभाग क्रमांक 6 मध्ये भाजपा ने गोपालसिंग मदनसिंग नैकाने यांना उमेदवारी दिली. इथे भाजप मध्ये बंडखोरी दिसुन आली या प्रभागातील भाजप चे अजय मानकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तुतारी वाजवली तर भाजप चे प्रदीप गुणाजी रहांगडाले यांनी शिवसेना शिंदे गटाचे धनुष्यबाण हाती धरले.
माजी नगरसेवक मोसिम शेख यांचा प्रभाग क्रमांक 7 हा सर्वसाधारण महिला राखीव झाल्याने इथे भाजप ने मनोनीत नगरसेवक पवन पखिड्डे यांच्या पत्नी वैशाली पखिड्डे यांना उमेदवारी दिली.
प्रभाग क्रमांक 8 मधुन कांन्टैक्टर विजय जैन यांच्या पत्नी गंगा जैन यांना भाजप ने उमेदवारी दिली. इथे युवराज मोटघरे यांनी भाजप कडे उमेदवारी मागितली होती असे म्हणतात. परंतु युवराज मोटघरे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवित आहेत.
प्रभाग क्रमांक. 9 मधुन भाजप ने माजी नगरसेविका सरस्वती लांडगे यांनी उमेदवारी मागितली.इथे मागच्या निवडणुकीत भाजप उमेदवार पराभूत झाला होता. येथुन कांग्रेसचे तिलक गजभिये निवडुन आले होते. इथे भाजप च्या सरस्वती लांडगे यांची भाची रमा बापुराव सोनवणे ला उमेदवारी मिळाली. भाजप च्या माजी नगरसेविका सरस्वती लांडगे यांनी शिवसेना शिंदे गटाकडुन आपली उमेदवारी दाखल केली आहे.
प्रभाग क्रमांक 10 मध्ये माजी नगराध्यक्ष राजेश रंगारी यांचे खंदे समर्थक विजय (जुग्गु) राऊत यांची उमेदवारी कापत भाजप ने गौतम रंगारी यांना उमेदवारी दिली. इथे विजय जैन हे अपक्ष उमेदवार आहेत. तर भाजप चे सचिन बाळक्रृष्ण वानखेडे यांना सुद्धा पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी शिवसेना शिंदे गटाकडुन उमेदवारी दाखल केली.
प्रभाग क्रमांक 11 मध्ये माजी गटनेता सारिका झोड यांना रिपिट न करता इथुन भाजपने सोनु क्रिष्णा उघडे यांना उमेदवारी दिली.
प्रभाग क्रमांक 12 मध्ये भाजपा चे इच्छुक उमेदवार अतुल मानवटकर, राजु सेवतकर या दोघांना उमेदवारी न देता इथुन भाजप ने सचिन भानुदास पाटील(पुर्वाश्रमीचे बसपा कार्यकर्ता) यांना उमेदवारी दिली. याआधी सचिन पाटील यांच्या पत्नी सविता वानखेडे पाटील ह्या बसपाच्या नगरसेविका तथा बांधकाम सभापती होत्या.
प्रभाग क्रमांक 13 मध्ये भाजपा ने संध्या पुरुषोत्तम साबळे यांना उमेदवारी दिली.
प्रभाग क्रमांक 14 मध्ये भाजपा च्या माजी नगरसेविका संगिता वरठी यांच्या जागी राजकुमार गुड्डु उईके यांना उमेदवारी दिली.
प्रभाग क्रमांक 15 मध्ये स्वाती दिलीप पटले यांना भाजप ने उमेदवारी दिली. इथे भाजप च्या ममता वरठे ह्या इच्छुक आणि प्रबळ दावेदार होत्या परंतु त्यांना उमेदवारी नाकारल्याने नाराजी आहे असे म्हटले जाते.
प्रभाग क्रमांक 16 मध्ये भाजपाचे पंकज ढोणे यांचा प्रभाग अनुसूचित जाती महिला राखीव झाल्याने इथे भाजप चे प्रितम लोहसारवा यांच्या पत्नी किंवा भाजप चे धडाकेबाज समाजसेवी कार्यकर्ता राष्ट्रगण चंद्रशेखर यांच्या पत्नी ला उमेदवारी मिळेल अशी चर्चा असतांना याठिकाणी यशवंत मेश्राम (गैरेजवाले) यांच्या पत्नी शितल यशवंत मेश्राम यांना उमेदवारी दिली. याठिकाणी राष्टगण चंद्रशेखर यांच्या पत्नी प्रिती राष्ट्रगण चंद्रशेखर यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली. कोणत्याही परिस्थितीत उमेदवारी मागे घेणार नाही अशी चंद्रशेखर यांची भुमिका आहे.
प्रभाग क्रमांक 17 मध्ये भाजपा ने अजय नांदुरकर यांना उमेदवारी दिली इथुन भाजप चे सुरेंद्र सोमकुंवर यांनी धनुष्यबाण हाती धरले आहे.
भाजप मध्ये बंडखोरी करणाऱ्यांवर होऊ शकते 6 वर्षासाठी निलंबनाची कारवाई!
एकंदरीत भाजपचे एक – दोन प्रभाग सोडले तर प्रत्येक प्रभागात मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली आहे. 21 तारखेला भाजप चे बंडखोर कोण उमेदवारी मागे घेणार याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. तर भाजप ची शिस्त भंग केल्याची बडतर्फीची कारवाई या बंडखोरांवर भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे करतील अशी चर्चा सुरू आहे. पक्षाविरुद्ध कारवाई केल्यामुळे भाजप च्या बंडखोरांवर पक्षातुन 6 वर्षासाठी निलंबन केलप जाऊ शकते. भाजप मध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी उफाळून आल्याने आणि जुन्या नगरसेवकांना डावल्याने याचा फटका भाजप ला बसण्याची दाट शक्यता आहे. भाजप मधील बंडखोरांनी आपला उमेदवारी अर्ज मागे न घेतल्यास भाजप नेते बावनकुळे काय कारवाई करतात हे ही बघणे तितके महत्वाचे ठरणार आहे. भाजपमधील बंडखोरीचा फायदा कांग्रेस ला होईल का? हा ही एक प्रश्न आहे.

































