श्री सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online
महादुला नगरपंचायत /नागपुर : 23 नोव्हेंबर 2025
नागपूर जिल्ह्य़ातील महादुला नगरपंचायत निवडणुक 2025 करिता राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे वरिष्ठ नेता अनिलबाबु देशमुख यांनी काल महादुला येथे राष्ट्रवादी पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अर्चना प्रविण मंडपे यांच्या प्रचारार्थ धावती भेट दिली.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या माजी नगरसेविका अर्चना मंडपे(सोनारे) यांना कांग्रेस ने नगराध्यक्ष पदाची उमेदवारी नाकारल्याने त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आपली उमेदवारी दाखल केली. काल माजी गृहमंत्री अनिलबाबु देशमुख, जिल्ह्यातील नेते प्रविण कुंटे पाटील यांनी काल महादुला येथे भेट देत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अर्चना प्रविण मंडपे(सोनारे) तसेच प्रभाग क्रमांक. 12 मधील उमेदवार अजय बागडे तसेच प्रभाग क्रमांक. 17 मधील उमेदवार किशोर राऊत यांच्या प्रचाराचा नारळ फोडला.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने पहिल्यांदा च महादुला नगरपंचायत निवडणुक लढवित आहे.
यावेळी महादुला येथे NCP (शरद पवार) पक्षाचे कार्यकर्ते तरुण रामटेके, महादुला शहरातील जुने कांग्रेस चे कार्यकर्ते ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा झंडा हाती घेतला असे राष्ट्रवादी काँग्रेसचे आकाश ऊके, सुमेध पखिड्डे, अनिल केशव बोरकर, निखिल चौधरी, प्रदीप मंडपे, Ex Man गोडबोले, बागडे,वानखेडे, तसेच अर्चना पाटील, पुनम पखिड्डे, वर्षा रंगारी,सौ. बागडे, सौ. नितनवरे, सौ. हेडाऊ, सौ. पुंडेकर, सौ. कुथे, सौ. ढेंगरे, सौ. पाटील, आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी माजी गृहमंत्री अनिलबाबु देशमुख यांनी महादुला येथील अनागरिक बौद्ध विहार येथील भगवान गौतम बुद्ध यांच्या मुर्तीला व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. तसेच आकाश ऊके यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयास भेट दिली.
यावेळी माजी गृहमंत्री अनिलबाबु देशमुख यांनी महादुला नगरपंचायत निवडणुकीत नगराध्यक्ष व दोन नगरसेवक यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले.


































