श्री.सुनील उत्तमराव साळवे
(9637661378)
मुख्य संपादक
Vansh News Digital Webportal online service.
हिंगोली- 6 सप्टेंबर 2025.
कुणाचीही लेखी तक्रार नसतांना औंढा नागनाथ चे तहसीलदार यांनी औंढा पोलीस निरीक्षक यांच्या पोलीस फौजफाट्याच्या मदतीने दि.5 ऑगस्ट 2025 रोजी बेरुळा या गावचा बौध्द अस्मितेचा प्रतिक असलेला निळा (ध्वज) झेंडा जेसिबीच्या मदतीने पाडला होता.तसेच प्रशासनाला याचा जाब विचारणाऱ्या आंबेडकरी समाजाचा नागरिकांना पोलीस प्रशासनाकडून अपमानास्पद वागणूक दिल्याच्या निषेधार्थ आजपासून 6 सप्टेंबर ते 8 सप्टेंबर 2025 पर्यंत भव्य लाँग मार्च व बिऱ्हाड आंदोलनाचे आयोजन बेरुळा येथील बौद्ध उपासक उपासिका यांनी केले आहे.


निळा झेंडा होता त्याच ठिकाणी सन्मानपूर्वक लावावा,दोषी अधिकारी, बिट जमादार यांचेवर अँट्रासिटी अँक्टनुसार कायदेशीर गुन्हे दाखल करावेत,बेरुळा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथील 70-80 फुट जागा बौद्ध समाजाच्या नावे शासकीय रेकॉर्ड वर नोंद घेणे अशा विविध मागण्यांसाठी बेरुळा येथील बौद्ध उपासक दिक्षान॔द साहेबराव साळवे,अजय अम्रृता साळवे, शेषराव देविदास घोडके, गौतम मुंजाजी इंगोले,सुनील कचरु दिपके यांनी केले असुन या लाँग मार्च व बिऱ्हाड आंदोलनात सहभागी होऊन बौध्द समाजाची एकजूट दाखवण्याचे आवाहन बौध्द उपासक व उपासिका यांनी केले आहे.
































