नागपुरातील वाडीत वंचित चे 4 नगरसेवक विजयी
श्री सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online
नागपुर : 22 डिसेंबर 2025
विधानसभा निवडणुकीत तेवढी चमकदार कामगिरी वंचित ची झाली नव्हती.. पण उशीरा का होईना वंचित बहुजन आघाडी ने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मध्ये मोठे कमबॅक केले.
वंचित चे 2 नगराध्यक्ष व जवळपास 61 नगरसेवक निवडुन आले. त्यामुळे प्रस्थापित राजकीय पक्षांसाठी आगामी महानगरपालिका निवडणुकीत वंचित आता मोठी तगडी फाईट देणार असे वातावरण निर्माण झाले आहे. वंचितच्या या घवघवीत यशावर प्रतिक्रिया देताना बाळासाहेब आंबेडकर म्हणाले की फुले शाहू आंबेडकरी विचारांचा हा विजय असुन भाजप व आर एस एस च्या राजकारणाला विरोध करणाऱ्या मतदारांचा हा कौल आहे. प्रस्थापित माध्यमांनी वंचित ची दखल जरी घेतली नसेल तरी वंचित च्या कार्यकर्त्यांनी वंचित ला घरोघरी पोहोचविण्याचे काम केले आहे.
अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे नगरपरिषद निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या प्रियंका निलेश विश्वकर्मा यांची नगराध्यक्षपदी निवड झाली आहे. तर अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी नगरपरिषद नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवार अख्तर खातुन यांचा विजय झाला आहे.
वंचित बहुजन विकास आघाडीच्या विजयी उमेदवाराची यादी


- नागपूरमध्ये वाडी नगरपरिषदेत सुनीता मेश्राम, शीतल नंदागवळी आणि राजेश जंगले विजयी
- कणकवली नगरपंचायत निवडणूक – वंचित बहुजन आघाडीचे (सत्यशोधक सेक्युलर फ्रंट, महाराष्ट्र) उमेदवार लुकेश कांबळे विजयी
- वाडी नगरपरिषदेत राजेश जंगले यांचा विजय, याा ठिकाणी आणखी ४ उमेदवार विजयी
- घाटंजी नगरपरिषद पोटनिवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार पायल संघपाल कांबळे यांचा विजय
- बुलढाणा: जळगाव जामोद नगरपरिषदेच्या प्रभाग क्र. १ (ब) मधून डॉ. मोहम्मद सलीम मोहम्मद सबीर विजयी
- शेगाव नगरपरिषदेच्या निवडणुकीत सीमा वोवे यांचा विजय
- जामखेड नगरपरिषदेत संगीता भालेराव यांचा दणदणीत विजय
- अकोट : प्रभाग क्रमांक ९ च्या पोटनिवडणुकीत इम्रान खान पठाण यांचा विजय
- – बाळापूर नगरपरिषदेवर वंचित बहुजन आघाडीचे १० उमेदवार विजयी
- – नांदेड : कंधार नगर पालिकेत दिलीप संतराम देशमुख विजयी
- देवळाली प्रवरात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संतोष चोळके विजयी
- हिवरखेड नगरपरिषदेत सविता सुनील इंगळे यांचा विजय
- बार्शी टाकळी नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग 16 मधून शेख साबीर शेख अमीन विजयी
- चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती नगरपालिकेत जयश्री दुर्योधन यांचा नगरसेवकपदी विजय
- अक्कलकोट नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग ११ मधून वंचितच्या उमेदवार प्रियांका मडीखांबे विजयी
- अहिल्यानगर – वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष संतोष चोळके विजयी
- वंचित बहुजन आघाडी संगमनेर सेवा समिती पुरस्कृत – प्रभाग क्रमांक 9 मधील अमजदखान उमरखान पठाण आणि विजया जयराम गुंजाळ विजयी
- – मुर्तिजापूर नगरपरिषदेत प्रभाग २ उमेदवार शशिकला सोळंके विजयी
- यवतमाळ नगर परिषदेमध्ये उमेदवार आनंद गायकवाड विजयी
- कर्जत जामखेड नगरपरिषद मध्ये अॅड. अरुण जाधव विजयी
- भद्रावती नगरपालिकेत राखी संतोष रामटेके सलग तिसऱ्यांदा विजयी
- मूर्तिजापूर नगरपरिषदेत वंचित बहुजन आघाडीचे तसवर खान विजयी
- वंचित बहुजन आघाडीच्या तेल्हारा नगरपरिषद नगरसेवक पदाच्या कान्होपात्रा फाटकर विजयी
- अकोला बाळापूर नगरपरिषदेत संजय उमाळे विजयी
- भूम नगरपरिषदेत रिमा ब्रह्मदेव शिंदे यांचा विजय
- धाराशिवमध्ये भगूर नगरपरिषदेत वंचित बहुजन आघाडीचे अजय वहाने विजयी
- हिवरखेड नगरपरिषदेत सविता सुनील इंगळे यांचा विजय


































