श्री. सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online
कामठी/नागपुर : 27 आँक्टोबर 2025
बहुजन रिपब्लिकन एकता मंच च्या संयोजीका ॲड. सुलेखाताई कुंभारे यांनी इंजिनियर राहुल आनंदराव बागडे यांची विदर्भ प्रदेश कार्याध्यक्ष या पदावर नुकतीच नियुक्ती केली आहे.
राहुल बागडे हे महानिर्मिती (म.रा. वि. मं.) मध्ये कार्यकारी अभियंता या पदावरून सेवानिवृत्त झाले असून ते विविध सामाजिक संघटना कामगार संघटना, मध्ये सक्रिय सहभागी आहेत
राहुल बागडे हे विदर्भ लोक विकास मंच चे संयोजक, भास्तीय बौध्द महासभा विदर्भप्रदेश सचीव, वनसंपदा या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य प्रविण प्रशिक्षक संघटनेचे सल्लागार असून विविध कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे पदाधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडली आहे.
राहुल बागडे यांच्या नियुक्तीमुळे बहुजन रिपब्लिकन एकता मंच ला अनुभवी व्यक्तिमत्व लाभले असून संघटनेला ते अधिक बळकट करतील असा विश्वास ॲड. सुलेखाताई कुंभारे यांनी व्यक्त केला.
त्यांच्या नियुक्तीचे अजय कदम, भिमराव फुसे, वंदना भगत, अफजल अंसारी, नियाज कुरेशी, अशपाक कुरेशी, तिलक गजभिये, उदास बन्सोड, विनय बांबोर्डे, दिपंकर गणवीर, अनुभव पाटील, दिपक सिरीया, इत्यादि बहुजन रिपब्लिकन एकता मंच च्या पदाधिका-यांनी अभिनंदन केले.



































