श्री.सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
VANSH NEWS Digital web portal online
वरणगाव/भुसावळ ‘ 27 मार्च 2025
आजकाल जलसंपदा मंत्री गिरिश महाजन भलतेच स्टंटबाजी करतांना दिसत आहे. कधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना आवाज देत बोलवतात तेव्हा गिरिश महाजन पळताना दिसतात तर कधी ते मिल्ट्रीच्या ट्रैकवर जंप मारतांना दुखापत करुन घेतात.
वरणगाव येथील शहीद जवान अर्जुन लक्ष्मण बाविस्कर यांना मानवंदना देण्यासाठी जलसंपदा मंत्री ना.गिरीष महाजन आज वरणगाव शहरात दाखल झाले व शहिद जवान अर्जुन बाविस्कर यांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी मिल्ट्रीच्या ट्रॅक मध्ये उंचावर जंप मारून चढले मात्र ट्रॅकचा वरचा रॉड थेट डोक्याला मार लागून जखमी झाले. खरे पाहता वाढते वयोमानासोबत जास्त स्टंटबाजी गिरिश महाजन यांनी करणे सोडुन दिले पाहिजे. अन्यथा त्यांच्या जीवावर ही बेतु शकते.
जलप्रदा मंत्री महाजन यांनी शाहिद जवान अर्जुन बाविस्कर यांच्या पार्थिव देहाला पुष्पचक्र अर्पण केले व अभिवादन केले. मंत्री महाजन ट्रॅक वरून खाली उतरले. डोक्याचे रक्त थांबत नसल्याने उपचारासाठी उपस्थित माजी नगराध्यक्ष सुनील काळे कामगार नेते मिलिंद मेढे भाजपा शहराध्यक्ष सुनील माळी शेख आखलाक यांनी आग्रह करून तातडीने हॉस्पिटल मध्ये नेले डॉ.पाटील यांनी उपचार करन. नाशिक ला पुढील उपचारासाठी रवाना केले.

