पालकमंत्री बावनकुळे सार्वजनिक शौचालयासाठी पुढाकार घेतील काय?
श्री सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online
महादुला नगरपंचायत /नागपुर : 17 फेब्रुवारी 2026.
महसुलमंत्री तथा नागपुर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते 3 महिन्याआधी मोठ्या थाटात महादुला टी पाँईट वर पोलिस चौकी व बस स्टाप चे मोठ्या थाटात उद्घाटन केले होते.
या कार्यक्रमांसाठी महादुला नगरपंचायत /कोराडी ग्रा. पं. तथा नागपुर शहर पोलीस प्रशासनाने एसीपी, डिसीपी कमिश्नर सर्वांनी हजेरी लावली होती. परंतु या पोलीस चौकित बसण्याची व्यवस्था आहे. परंतु या ठिकाणी तक्रार घेऊ शकत नाही. कारण ती व्यवस्था या ठिकाणी नाही त्याचबरोबर 2-4 दिवसातून एकदा उघडणाऱ्या या हायटेक महादुला पोलिस चौकीत कर्तव्यावर पाठवलेले 2-3 पोलीस कर्मचारी या ठिकाणी दिसतात. परंतु त्यांचे हाल देखवत नाही. कारण त्यांची या ठिकाणी मुतायची सोय नाही. एखाद्या वेळी एखाद्या कर्मचाऱ्याला जोराची संडास लागली. तर त्याचे मोठ हाल खराब! एक स्वच्छता ग्रुह या ठिकाणी बनविले नसल्याने या ठिकाणी पोलीस कर्मचारी हवालदिल झाले आहेत.
त्याचबरोबर बाजुला बनविलेल्या बसस्टॉप ला प्रवाशांना बसण्याची सोय झाली परंतु तिथेही स्वच्छता ग्रुह बनविले नाही. त्यामुळे या तथाकथित हायटेक महादुला पोलीस चौकी व बस स्टॉप ची दशा केव्हा बदलणार? हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी उपस्थित झाला आहे. बाहेरुन काही कामानिमित्त आलेल्या नागरिकांना सार्वजनिक स्वच्छतागृह नसल्याने उघड्यावर लघवी व शौच करायला जावे लागते. एकवेळ चे माणसाचे चालुन जाईल.. महिलांचे काय? महिलांच्या प्रायवेसी चे काय? महिला उघड्यावर जाऊ शकत नाही.
त्यामुळे स्थानिक नगरपंचायत प्रशासन /पोलीस प्रशासन /आणि जनप्रतिनिधी यांनी अतितातकाळ या गोष्टीचे गांभीर्य ओळखून अत्याधुनिक सार्वजनिक शौचालये किंवा मुवेबल (फिरते शौचालय ठेवावे) अशी पोलीस कर्मचारी व जनतेची मागणी आहे.


































