Vansh News Digital Web portal online
(9637661378 /9527190782)
नागपुर : 10 फेब्रुवारी 2026.
बोधगया येथील महाबोधी महाविहार हे बौद्ध समाजासाठी एक अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे. या महाविहाराचे संपूर्ण व्यवस्थापन बौद्ध समाजाकडे सोपवण्यात यावे आणि त्यासाठी 1949 चा महाबोधी महाविहार व्यवस्थापन कायदा (BT act) तात्काळ रद्द करावा, या मागणीसाठी आज महादुला येथुन शताब्दी बहुउद्देशीय संस्था महादुला
रत्नदीप रंगारी यांच्या नेतृत्वात शेकडो भीमसैनिक आज दुपारी नागपूर रेल्वे स्टेशन वरून दिल्ली जंतर मंतर आंदोलनामध्ये सहभागी होण्याकरिता रवाना झाले.

दि. 12 फेब्रुवारी 2026 रोजी शांती व अहिंसेच्या मार्गाने भंते विनाचार्य यांच्या नेतृत्वाखाली भव्य आंदोलन ” आखरी लढाई” नवी दिल्ली येथील जंतर-मंतर येथे होणार आहे. या आंदोलनाला कांग्रेस व समविचारी पक्षांची आमदार खासदार यांनी समर्थन दिले असुन आंदोलनातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे केंद्र सरकार तसेच बिहार येथील मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या सरकारवर दबाव बनणार आणि B. T. Act 1949 रद्द होऊन बोधिगया महाविहार ब्राम्हणांच्या तावडीतुन मुक्त होईल असा बौद्ध समाजाला विश्वास आहे.
महाबोधी महाविहार बुद्धगया मुक्ती आंदोलनात सहभागी होण्यासाठी महादुला-कोराडी येथुन पत्रकार सुनील साळवे, दत्ता बंसोड, ललित पाटील, उमेश मेंढे, नंदु नानवटकर, विनीत मेंढे, अभी बंसोड, दिनेश धारपुरे रविंद्र गायकवाड, विक्की हनवते, दिनेश मेश्राम, आदेश तिरपुडे, संदीप तिरपुडे, प्रदीप गजभिये, राहुल पटले, पियुश मेश्राम, निखील सोनटक्के, प्रितम सोनपिपरे, स्वयम अंबादे, संजय बरोडे, प्रदीप राऊत, शंकर छत्री सचिन आळणे, आनंद कांबळे, कार्तिक हिरवाणी, विष्णु अंभोरे, सरस्वती अंबादे, शोभा बोरकर, वंदना मेश्राम, संगिता टापरे,गुंफा ताकसांडे, रंजना लांडगे, चंद्रभागा सोनपिपरे, रंजिता जनबंधु, येनूताई इंदुरकर
निलिमा कुत्तरमारे, ललिता वाघमारे आदींचा समावेश आहे.



































