श्री. सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online.
कामठी /नागपुर : 10 फेब्रुवारी 2026
कामठी नगरपरिषद अंतर्गत अंत्यसंस्कारासाठी मोफत लाकडे देण्याची मागणी बसपा नगरसेवक नितेश यादव यांनी नगराध्यक्ष अजय अग्रवाल यांना 6 फेब्रुवारी 2026 ला निवेदन दिले.

कामठी लगतच असलेल्या आजनी नवीन मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार शव जाळण्यासाठी सर्वांना लाकुड मोफत देण्याची मागणी बसपा नगरसेवक नितेश यादव यांनी नगराध्यक्ष अजय अग्रवाल यांना एका निवेदनाद्वारे केली.
कामठी शहरात दैनंदिन अंत्ययात्रा होत असल्याने आजनी नवीन मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येत असतात. त्या अंत्ययात्रेत शव जाळण्यासाठी लागणारे लाकडे मोक्षधाम मार्फत रुपये घेतले जातात. आर्थिक अडचणीमुळे गोर-गरीब जनतेला पैशाची अडचण असते व ते देण्यास असमर्थ असतात. आधीच त्यांच्यावर दुःखाचे डोंगर कोसळले असते. आकस्मिक निधनाने त्यांना पैशाची जुळवाजुळव करतांना वेळ लागतो. यासाठी आजनी नवीन मोक्षधाम येथे अंत्ययात्रेत शव जाळण्यासाठी लागणारे लाकुड नगर परिषद कामठी तर्फे निःशुल्क देण्याची मागणी बसपा नगरसेवक नितेश यादव यांनी केली आहे. निवेदन देतेवेळी माजी न. प.सभापती विकास रंगारी, समाजसेवक नागसेन गजभिये सह अन्य मान्यवर उपस्थित होते.



































