श्री सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online.
महादुला /नागपुर : 9 फेब्रुवारी 2026.
महादुला शहरातील ढेंगरे ले आऊट जुने गावठाण महादुला येथील कु. अनुष्का नरेंद्र ढोक वय (15 वर्ष) हिने ऐन दहावीच्या परीक्षेच्या तोंडावर आत्महत्या केल्याची घटना घडली.
अनुष्का ही दहेगाव खापरखेडा मार्गावरील सेंट अॅन्स इंग्लिश मीडियम स्कूल (सीबीएसई)या शाळेतील इयत्ता 10 वी ची विद्यार्थ्यांनी असुन काल सायंकाळी 7 च्या दरम्यान तिने तिच्या खोलीत आत्महत्या केली. प्राप्त माहितीनुसार अनुष्का काल संत गजानन महाराज प्रकटदिनानिमित्त आयोजित मिरवणुकीत सहभागी झाली होती तसेच तिने धनगौरी मंदिर परिसरात महाप्रसाद घेऊन ती घरी गेली त्यावेळी तिच्या घरी तिची आजी होती. तिची आई नातेवाईकांकडे एका खाजगी कार्यक्रमासाठी गेली असल्याचे समजते. अनुष्का अभ्यास करते म्हणून तिच्या खोलीत आतमधुन कडी लावून घेतली. काही वेळाने ती बाहेर न आल्याने घरच्यांनी तिला हाका मारल्या पण तिने दार उघडले नाही.तिने खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समजते . कोराडी पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि अनुष्काचे प्रेत उत्तरीय तपासणीसाठी मेयो रुग्णालयात दाखल केले.
अनुष्काचे वडील हे सैन्यात असल्याचे समजते. त्यांना घटनेची माहिती मिळाली परंतु त्यांना नागपुरला येण्यासाठी फ्लाईट मिळाली नसल्याचे समजते. ते उद्यापर्यंत येतील असे समजते. अभ्यासाचा मानसिक दबाव सहन न झाल्याने अनुष्का ने गळफास घेऊन आत्महत्या केली असावी अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.



































