श्री.सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online.
कोराडी/नागपुर : 9 फेब्रुवारी 2026.
नागपुर जिल्ह्यातील कोराडी महाजेनको विद्युत विहार काँलनीतील श्री क्षेत्र अग्रदुत हनुमान मंदिर परिसरात संत गजानन महाराज यांच्या प्रकटदिनानिमित्त काल मोठ्या प्रमाणात पालखी मिरवणूक काढण्यात आली. या पालखी व दिंडीत कोराडी महाजेनको प्रकल्पाचे मुख्य अभियंता विलास मोटघरे प्रामुख्याने सहभागी झाले होते.

श्री संत गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त नागपूर जिल्ह्यातील कोराडी येथील अग्रदुत हनुमान मंदिरास भेट देऊन श्री संत गजानन महाराज यांचे दर्शन घेतले व सर्वांच्या सुख, शांती व समृद्धीची प्रार्थना केली.
काल झालेल्या या कार्यक्रमाला विद्युत विहार कोराडी काँलनीतील हजारो नागरिकांनी सहभागी होत श्री संत गजानन महाराज यांचा प्रकटदिन मोठ्या हर्षोत्सात साजरा केला. दि. 2 फेब्रुवारी पासुन हरिपाठ, सामुदायिक प्रार्थना, पारायण ग्रामगीता प्रवचन , भजन, काल्याचे कीर्तन ज्ञानेश्वरी अंतरंगावर प्रवचन आदी विविध कार्यक्रमाचे 8 फेब्रुवारी पर्यत दररोज आयोजन करण्यात आले. काल कार्यक्रमाच्या शेवटच्या दिवशी 5 हजार नागरिकांनी महाप्रसादाचे लाभ घेतला.


यावेळी कोराडी औष्णिक विद्युत केंद्राचे उपमुख्य अभियंता प्रभाकर इंगळे, हर्षद खंडारे, प्रवीण बुटे, परीक्षित दापुरकर, पुरुषोत्तम साबळे, निलेश चरखे, प्रदीप लांडे, सुनिल एकुनकर, अमित गई, मिलेश पुणेकर, प्रशांत गोरडे, दिलीप पटले, बाबा पन्नासे यांच्यासह अन्य मान्यवर व नागरिक उपस्थित होते.
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही कार्यक्रमाला दिली भेट!

काल रविवारी श्री संत गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त आयोजित कोराडी काँलनीतील या कार्यक्रमांला नागपुर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुद्धा आवर्जून भेट देत संत गजानन महाराज यांचे दर्शन घेतले. त्यांचे सोबत महादुला नगरपंचायत च्या नगराध्यक्ष हेमलता सावजी नगरसेविका संध्या साबळे,स्वाती पटले, नगरसेवक अभिजीत ढेंगरे,सौ. कविता एकुणकर, सौ. वैराळे आदी प्रामुख्याने उपस्थित होत्या.




































