श्री सुनील उत्तमराव साळवे
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online.
महादुला कोराडी /नागपुर : 5 फेब्रुवारी 2026.
नागपूर जिल्ह्य़ातील महादुला कोराडी येथे उड्डाणपुल बनल्यानंतर शाळकरी विद्यार्थ्यांना जीवघेणा राष्ट्रीय महामार्ग ओलांडावा लागत होता. म्हातारे लोक सुद्धा डिवाइडर ओलांडून जाणेयेणे करायचे. त्यावेळी VANSH NEWS चैनलवर ही बातमी प्रकाशित झाली आणि शाळकरी विद्यार्थ्याच्या व हितासाठी अंडरग्राऊंड भुयारी मार्ग बनवण्याची मागणी मांडली होती.परंतु या ठिकाणी भुयारी मार्ग न बनवता Foot Over Bridge ची संकल्पना नागपुर चे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आणली. महादुला कारेमोरे चौक, नवीन कोराडी वंजारी भवन व कोराडी पांजरा या तिन ठिकाणी शासकीय निधीतुन Foot Over Bridge बनविण्यात आले पण याचा सदुपयोग किती होईल? हे आताच सांगणे कठीण होईल.
शाळकरी विद्यार्थी एक मौज म्हणून या ब्रिजवरून सध्या चालतांनी दिसतात. पलंतु म्हाताऱ्या लोकांना या ब्रिजवर चढणे अशक्य आहे. आताही या ब्रिज चा वापर कमी होतोय. राष्ट्रीय महामार्ग ओलांडुन च विद्यार्थी व नागरिक जात आहेत. त्यामुळे Foot Over Bridge ची अवस्था मनसर च्या पडित ब्रिजसारखी होऊ नये.
Foot Over Bridge च्या आजुबाजुचे अतिक्रमण केव्हा काढणार?
ज्या ठिकाणाहून विद्यार्थी Foot Over Bridge वर चढतात आणि जिथुन ते उतरतात त्या ठिकाणी दोन्ही बाजूला अनाधिकृत अतिक्रमण आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना ब्रिजवरून खाली उतरुन परत अरुंध अशा सर्विस रोडवरुन चालावे लागते त्यामुळे अपघाताचा धोका टळला नाही. मग अशा परिस्थितीत Foot Over Bridge बनविण्याचा काही उपयोग राहिला नाही असेच वाटते. ब्रिज च्या दोन्ही IN आणि OUT च्या ठिकाणी चालण्यासाठी फुटपाथ आवश्यक आहे. परंतु मागील 15 वर्षापासुन कोराडी छिंदवाडा हायवे वरील ड्रैनेज नाली येथील दुकानदारांनी गिळंकृत केली आहे.ड्रैनेज नालीच्या दोन्ही बाजूला सर्विस रोडवर पायी चालण्यासाठी फुटपाथ आवश्यक आहे. फुटपाथ नसल्याने नागरिकांना सर्व्हिस रोडवर चालणे कठीण झाले आहे. या करिता महादुला नगरपंचायत प्रशासनाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण तसेच सरकारच्या मदतीने हे अतिक्रमण अतितातकाळ काढण्याची गरज आहे.त्याचबरोबर सर्विस रोडवर दररोज चा व्यवसाय करणाऱ्या फुटपाथ दुकानदारांचे योग्य ठिकाणी पुनर्वसन करावे जेणेकरून त्यांचेवर अन्याय होणार नाही.


पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. आता निवडणुका नाहीत त्यामुळे वोटबैंक कमी होण्याची भीती नाही. त्यामुळे Foot Over Bridge च्या दोन्ही भोवताल चा सर्विस रोड चे अतिक्रमण काढण्यासाठी स्थानिक प्रशासनाला सुचना व दिशानिर्देश देण्याची गरज आहे अशी नागरिकांची मागणी आहे.




































