उपमहापौर लिलाताई हाथीबेड करतील २१ ‘रणरागिणी’ यांचा सन्मान
श्री सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online.
नागपूरः7 मार्च 2026
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ‘निर्धार’ महिला व बालविकास समिती, नागपूर’ यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ‘निर्धार’ महिला पुरस्कार-2026′ वितरण सोहळ्याचे शानदार आयोजन करण्यात आले आहे. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांना या पुरस्काराने सन्मानित करून त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव केला जाणार आहे.
हा सोहळा रविवार, 8 मार्च 2026 रोजी सकाळी 11 वाजता उत्तर नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटर येथे संपन्न होईल. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समितीच्या संस्थापिका अध्यक्षा व माजी राज्यमंत्री ॲड. सुलेखाताई कुंभारे राहतील. कार्यक्रमाचे उद्घाटन नागपूरच्या उपमहापौर श्रीमती लीलाताई हाथीबेड यांच्या हस्ते होईल.
या प्रसंगी डॉ. रेखा सपकाळ, (स्त्री रोग तज्ञ), सुमेधा नितीन राऊत, डॉ. सरीता मिलींद माने, ॲड. रंजना निकोसे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित यहुन मार्गदर्शन करतील. तसेच श्रीमती ज्योती चंद्रशेखर बावनकुळे, श्रीमती रोशनी सिद्धार्थ गायकवाड यांना सुध्दा कार्यक्रमाला आमंत्रित करण्यात आले आहे.
विविध क्षेत्रांतील ‘या’ रणरागिणीं चा होणार सन्मान
यंदाच्या वर्षी सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, पत्रकारिता आणि कला अशा विविध क्षेत्रांतील 21 महिलांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. यात प्रामुख्याने शैक्षणिक क्षेत्रातः डॉ राजश्री पुरण मेश्राम, (कविकुलगुरू संस्कृत विद्यापिठ), सुनंदा दिनेश वाघमारे (आदर्श शिक्षिका, मनपा, नागपुर), सामाजिक क्षेत्रातून: कविता डंभारे व रत्नमाला मेश्राम व साहीत्यीक क्षेत्रातः मालतीताई साखरे (विवारवंत साहित्यीक), नुसरत मिनु (उर्दु विभाग प्रमुख, वसंतराव नाईक शासकीय कला महाविद्यालय, नागपुर) यांचा सत्कार करण्यात येईल. तसेच राजकीय क्षेत्रातूनः नगर परिषद कामठी च्या उपाध्यक्षा सबा तौसीफ खान, नागपुर महानगर पलीकेच्या नवनिर्वाचित नगरसेविका कल्पना राजा द्रोणकर, संगीता सुरेश पाटील, मा. भावना लोणारे, तसेच सावनेर येथील महिला बाल विकास सभापती अर्पणा उज्वल बागडे यांचा स्मृतिचिन्ह देवून सकार करण्यात येईल. पत्रकारिता क्षेत्रात: रचना गजभिये (नागपूर दूरदर्शन), संगीता प्रिया पाठक, वैद्यकीय क्षेत्रातुन: डॉ. शबनम (वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय), प्रशासकीयः अनिता उदय मोरे (सहायक पोलीस आयुक्त), शालिनी गेडाम (सहायक अन्नधान्य वितरण अधिकारी), क्रीडा क्षेत्रातून: दिशा कासट (आय.पी. एल. खेळाडू), रितीका हिवतोडे (नॅशनल कबड्डी खेळाडू व विदर्भ रेफ्री), कला क्षेत्रातून: अल्का राऊत (पार्श्व गायीका), अपर्णा लखमापुरे (थिएटर आर्टिस्ट) आणि उद्योगः संगिता अग्रवाल (लघुउद्योगिका), आम्रपाली रूपेश वासे (स्वयंरोजगार) यांचा सुध्दा स्मृतिचिन्ह देवून सन्मान करण्या येईल.
समितीचे सामाजिक योगदान
‘निर्धार’ समितीच्या वतीने केवळ पुरस्कारच नव्हे, तर वर्षभर महिला सक्षमीकरण, बचत गटांना मार्गदर्शन, कायदेशीर सल्ला केंद्र, आरोग्य शिबिरे आणि विद्यार्थी प्रबोधन असे अनेक स्तुत्य उपक्रम सितावडी झाशी राणी चौक येथील ‘निर्धार’ महिला व बाल विकास समिती या मुख्य कार्यलयातनुन वर्षभर राबविले जातात. या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेच्या सचिव नंदा गोडघाटे यांच्या वतीने करण्यात आले आहे.




































