श्री सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online.
नवी दिल्ली : 5 मार्च 2026.
महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सात जागेसाठी आज नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची मुदत दुपारी तीन वाजेपर्यंत होती. ठरलेल्या मुदतीत भाजप चे 4 तर शिवसेना शिंदे पक्ष – 1 राष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवार) -1 आणि महाविकास आघाडीतर्फे 1 असे 7 च अर्ज दाखल करण्यात आल्याने राज्यसभेसाठी रणसंग्राम टाळला गेला. राज्यसभेसाठी या सातही जागेसाठी आता राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते शरद पवार, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले, प्रा. ज्योती वाघमारे, मायाताई इवनाते, रामराव वडकुते आणि पार्थ पवार हे सातही जण बिनविरोध खासदार म्हणून राज्यसभेवर जाणार आहेत.
राज्यसभेसाठी ठरलेला 37 मतांचा कोटा त्यांच्याकडे असल्याने राज्यसभा निवडणुक ही बिनविरोध करण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी खेळी केली. राज्यसभा निवडणुकीचा मोठा रणसंग्राम मात्र या निमित्ताने टळला आहे.
भाजपने राज्यसभेसाठी जाहीर केलेल्या यादीमध्ये माजी मंत्री विनोद तावडे, आरपीआय (आठवले गट) पक्षाचे प्रमुख तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, भाजपाचे हिंगोलीतील नेते रामराव वडकुते, नागपूरच्या भाजपाच्या नेत्या माया इवनाते यांचे नाव आधीच जाहीर केले होते. प्रत्येक एक जागा ही अजितदादांच्या राष्ट्रवादीला तसेच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सोडण्यात आली होती. राष्ट्रवादी अजित पवार पक्षातर्फे पार्थ पवार व शिवसेना शिंदे पक्षाच्या प्रा. ज्योती वाघमारे यांना उमेदवारी जाहीर झाली.
सातव्या जागेसाठी कांग्रेस व शिवसेना पक्षातर्फे नवीन नाव येण्याची शक्यता वर्तविली जात होती. शिवसेना उबाठा तर्फे प्रियंका चतुर्वेदी यांचे ही नाव चर्चेत होते. परंतु ऐनवेळी शरद पवार यांचे नाव महाविकास आघाडी कडुन जाहीर झाल्याने राज्यसभा निवडणुक आता बिनविरोध होणार आहे.
महाराष्ट्रातून राज्यसभेसाठी भाजपतर्फे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले, मायाताई इवनाते माजी मंत्री विनोद तावडे,रामराव वडकुते तसेच राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे पार्थ पवार,शिवसेना शिंदे पक्षाच्या प्रा. ज्योती वाघमारे, महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते शरद पवार यांची बिनविरोध निवड झाल्यासारखे च म्हणावे लागेल.
सातव्या जागेसाठी महाविकास आघाडीकडून राज्यसभेसाठी शरद पवार यांचे नाव जाहीर झाल्याने ही निवडणूक बिनविरोध करण्याची भाजपाने तयारी चालवली . परंतु महाविकास आघाडीने ठाकरे गट किंवा काँग्रेस या पक्षातील नेत्यांना उमेदवारी दिली तर भाजपादेखील सातव्या जागेसाठी उमेदवार देऊ शकते, असे सांगितले जात होते.उमेदवार निवडून येण्यासाठी पहिल्या पसंतीच्या 37 मतांची गरज होती. महायुतीचे संख्याबळ 232 आहे. शिंदे गटाकडे 20 मते तर अजित पवार यांच्या पक्षाकडे तीन मते अतिरिक्त आहेत. त्यामुळे ऐनवेळी मतांची जुळवाजुळव करून भाजपा सातव्या जागेसाठी ताकद लावण्याची शक्यता व्यक्त केली जात होती.


































