श्री सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online.
नागपुर : 24 फेब्रुवारी 2026.
प्रिआंती इंग्लिश स्कुल अँड ज्युनिअर कॉलेज तरोडी (बु) ता. कामठी जि. नागपूर या शाळेने क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नागपूर द्वारा आयोजित शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये विविध खेळ प्रकारात उत्कृष्ठ कामगिरी करून नागपूर जिल्ह्यातून द्वितीय प्राविण्य प्राप्त केले.
त्याअनुषंगाने आज दिनांक 24 फेब्रुवारी 2026 ला शालेय स्तरावर क्रीडा क्षेत्राच्या सर्वांगीन विकासासाठी शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या प्रोहत्सनात्मक अनुदान योजनेतर्गत शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये आमच्या प्रिआंती इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज च्या खेळाडू विध्यार्थ्यानी विविध क्रीडा प्रकारात नागपूर जिल्ह्यातून द्वितीय प्राविन्य प्राप्त केल्याबद्दल आज छत्रपती शिवाजी महाराज सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय सिव्हिल लाईन नागपूर येथे, शाळेचे संचालक रमेश लेकुरवाळे सर (सचिव श्री.गजानन शिक्षण सेवा संस्था नागपूर ) यांचा जिल्हाधिकारी विपीन इटणकर यांच्या हस्ते प्राविण्य प्रमाणपत्र, मेजर ज्ञानचंद यांची प्रतिमा व 1,25,308/-₹ NEFT करून सन्मान व गौरव करण्यात आला.

हे यश विध्यार्थ्यांच्या कौशल्य, परिश्रम, शिस्त व संघभावनेचे तसेच क्रीडा प्रशिक्षक प्राचार्या व व्यवस्थापनाच्या मार्गदर्शनाचे प्रतिक आहे. शालेय क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी महाराष्ट्र शासनाच्या धोरणांना अनुसरून साध्य केलेले हे यश प्रेरणादायी आहे.याप्रसंगी श्रीमती पल्लवी धात्रक ( जिल्हा क्रीडा अधिकारी नागपूर) ह्या प्रामुख्याने उपस्थित होत्या. त्यांनी यावेळी बोलताना सांगितले की,” नागपूर जिल्ह्यातून द्वितीय प्राविण्य प्राप्त केल्याबद्दल भविष्यातही आपली शाळा क्रीडा क्षेत्रात सातत्यपूर्ण यश संपादन करो अशी सदिच्छा व्यक्त केली, आणि शाळेच्या प्राचार्या, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी ,क्रीडा शिक्षक व खेळाडू विद्यार्थ्यांचे कौतुक केले व शुभेच्छा दिल्या.




































