श्री सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online.
महादुला कोराडी /नागपुर : 20 फेब्रुवारी 2026.
नागपुर जिल्ह्यातील महादुला नगरपंचायत येथील निर्माणाधीन डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक व वाचनालयाच्या शेजारी परवा रातोरात सकल हिंदु समाजाच्या तथाकथित कार्यकर्त्यांनी महादुला नगरपंचायत तथा कोराडी पोलीस स्टेशन व जिल्हाधिकारी नागपुर प्रशासनाची कोणतीही परवानगी न घेता बेकायदेशीर रित्या खाऊगल्लीत हायमास्ट पोल उभारुन त्यवर त्रिशुल व भगवा ध्वज लावल्याने काल आंबेडकरी समाजात असंतोष निर्माण झाला आहे.

निर्माणाधीन डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या बांधकामाचा आढावा घेण्यास पोहोचले पालकमंत्री परंतु अनाधिकृत हायमास्ट कडे त्यांचे दुर्लक्ष?
काल दि. 19 फेब्रुवारी 2026 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक व ई लायब्ररी च्या बांधकामाचा आढावा घेण्यासाठी नागपुर जिल्ह्याचे पालकमंत्री पोहोचले होते. त्यावेळी तिथे उपस्थित आंबेडकरी बांधवात असंतोष होता. पालकमंत्री यांच्या कानावर हा विषय टाकण्याची येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे पदाधिकारी व विद्यमान नगरसेवक यांची इच्छा होती. परंतु काल छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती असल्याने त्यांनी जयंती झाल्यावर नगरपंचायत व कोराडी पोलीस स्टेशन प्रशासन तसेच नागपुर जिल्हाधिकारी यांना लेखी तक्रार देणार असल्याची माहिती नगरसेवक आम्रपाली सोनारे, प्रतिभा गजभिये, व पुजा मेश्राम यांनी सांगितले.

काल पालकमंत्री हे तिथे पोहोचले पण त्यांना बेकायदेशीर हायमास्ट पोल व त्यावर लावलेले त्रिशुल व भगवा ध्वज कसा काय दिसला नाही? याची चर्चा आहे. तर पालकमंत्री यांना याची सर्व कल्पना नव्हती का? की त्यांनी जानुनबुजुन याकडे कानाडोळा केला? .
17 एप्रिल 2024 ची पुनरावृत्ति टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाने घ्यावी खबरदारी
मागे 17 एप्रिल 2024 ला याच परिसरात रामनवमी निमित्ताने निघालेल्या मिरवणुकीत काही समाजकंटकांनी आंबेडकरी समाजाच्या भावना दुखावल्या म्हणून दोन्ही समाज आमनेसामने आला होता. यावेळी दंगल सद्रृष्य परिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर दोन्ही कडील 150 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. तत्कालीन डीसीपी यांनी या परिसरात उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूला 100 मीटरच्या आत कोणतेही धार्मिक /राजकीय बैनर व कार्यक्रमांवर बंदी टाकली होती. तरीही या सर्व नियमांचे सर्रास उल्लंघन करुन पुन्हा जातीय तेढ निर्माण करण्याचा काही लोकांकडून प्रयत्न सुरु असल्याचे दिसून येते. तिच परिस्थिती पुढे येऊ नये.यासाठी स्थानिक प्रशासनाचे कठोर कारवाई करण्याची गरज आहे.
कोणताही नविन झंडा उभारण्यासाठी परवानग्या आवश्यक
सार्वजनिक ठिकाणी कोणताही धार्मिक ध्वज उभारण्यासाठी शासन व कोर्टाने नविन नियमावली व कठोर कायदा काढला आहे. सहजासहजी आपण कोणताही धार्मिक ध्वज उभारु शकत नाही. त्यासाठी जिल्ह्याधिकारी, एसडीओ, तहसीलदार, पोलिस आयुक्त, नगरपंचायत प्रशासनाची कायदेशीर परवानगी आवश्यक आहे. एखाद्या धार्मिक स्थळाच्या 500 मीटरच्या सभोवताल दुसरे धार्मिक स्थळ /ध्वज मंदिर /प्रार्थना स्थल उभे राहु शकत नाही.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाशेजारी रातोरात 100 फुटापेक्षा उंच हायमास्ट पोल कसा काय उभा राहिला? त्यावेळी कोराडी पोलिसांची गुप्तहेर शाखा काय झोपा काढत होती काय? हायमास्ट पोल ला वीजेचे कनेक्शन कोणी दिले? काय महावितरण चे अधिकारी कर्मचारी यांनी बेकायदेशीर हायमास्ट ला वीज कनेक्शन दिले? महादुला नगरपंचायत प्रशासनाने याबाबतीत कानावर हात ठेवले आहे. महादुला नगरपंचायत चे मुख्याधिकारी अमर हांडा यांना याविषयी विचारले असता म्हणाले कि हा हायमास्ट पोल कोणी उभारला? याविषयी त्यांना काही माहिती नाही तसेच त्याची नगरपंचायत प्रशासनाकडे कोणीही परवानगी मागितली नाही. त्यामुळे अशा बेकायदेशीर हायमास्ट वर लावलेले त्रिशुल व भगवा ध्वज अतितातकाळ ताब्यात घेण्यासाठी कोराडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करुन तो जप्त करावा अशी आंबेडकरी समाजाची मागणी आहे. जेणेकरुन दोन्ही समाजात सलोखा राहील.


































