श्री सुनील उत्तमराव साळवे.
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online.
नागपुर : 21 फेब्रुवारी 2026.
जेष्ठ रिपब्लिकन नेते तथा माजी खासदार प्रा.जोगेंद्र कवाडे सर यांच्या पत्नी तथा माजी राज्यमंत्री ॲड. सुलेखाताई कुंभारे यांच्या मामी प्रा.रंजना जोगेंद्र कवाडे यांचे आज पहाटे 4:30 च्या दरम्यान दुःखद निधन झाले.
डॉ. आंबेडकर काँलेज दीक्षाभुमी नागपुर येथे प्रा. रंजना कवाडे ह्या प्राध्यापक म्हणून कार्यरत असताना आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ रिपब्लिकन नेते प्रा. जोगेंद्र कवाडे सर यांच्या कार्याने प्रभावित होऊन प्रा. जोगेंद्र कवाडे यांचेशी त्यांनी आंतरजातीय विवाह केला होता. प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्या खांद्याला खांदा लावून आंबेडकरी चळवळीतील प्रत्येक आंदोलनात प्रा. रंजना कवाडे यांनी त्यांचे पतीसोबत आपले योगदान दिले. प्रा. रंजना कवाडे ह्या आधी हिंदुधर्मिय होत्या लग्नानंतर त्या तथागत भगवान गौतम बुद्ध व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या वैज्ञानिक विचाराने प्रभावित होत त्या बौद्ध धम्माकडे प्रभावित झाल्या होत्या.

ज्येष्ठ रिपब्लिकन नेते प्रा. Jogendraji Kawadesir यांच्या पत्नी प्रा.रंजनाताई कवाडे (वय 76) यांचे आज पहाटे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांना अर्नेजा हाँस्पिटल ‘ मध्ये उपचारासाठी दाखल केले होते. “लांग मार्च” पासून मराठवाडा विद्यापीठ नामांतरासाठीच्या लढ्यात नोकरी, घरदार, कुटुंबाला प्राधान्य न देता प्रा. कवाडे यांनी झोकून दिल्यापासून त्यांना रंजनाताई यांनी मोलाची साथ दिली. तब्बल 16 वर्षे झुंजत नामविस्ताराची विजयश्री खेचून आणण्यात आंबेडकरी चळवळीला आलेल्या यशात रंजनाताई यांनी दिलेले योगदान कायम स्मरणात राहील.
त्यांची अंत्ययात्रा नागपूर लक्ष्मीनगर येथील त्यांच्या निवासस्थानावरून आज सायंकाळी 4 वाजता निघणार आहे. दिवंगत प्रा. रंजना कवाडे यांना दोन मुली व एक मुलगा जयदीप कवाडे व नातवंडाचा मोठा परिवार आहे.
प्रा. जोगेंद्र कवाडे सर यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. दिवंगत प्रा. रंजना जोगेंद्र कवाडे यांना VANSH NEWS Digital Web portal चैनल तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली! 🙏🙏🙏🎉🎉🎉😢😢😢




































