श्री सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online.
खापरखेडा /नागपुर – नागपुर शहरातील कोराडी पो. स्टे. अंतर्गत खापरी गावालगत कोराडी खापरखेडा मार्गावरील कन्वेअर बेल्ट पिल्लर जवळ एका इसमाची आज दुपारी 12 वाजता च्या सुमारास निर्घृण हत्या करण्यात आली.
प्राप्त माहितीनुसार कोराडी खापरखेडा मार्गावरून एक नागरिक त्याच्या कारने जात असतांना त्याला या रोडवर एक महिला एका इसमासोबत जोरजोराने भांडत होती तिच्या हातात धारधार शस्त्र होते. त्या नागरिकाने खापरखेडा पोलिसांना याची माहिती दिली. खापरखेडा पोलिस घटनास्थळी पोहोचण्याआधीच त्या अज्ञात इसमाची हत्या झाली. या घटनेची माहिती मिळताच त्या ठिकाणी नागरिकांची गर्दी उसळली होती.
आज गुरुवारी सकाळी सुमारे 12 वाजता भरदिवसा घडलेल्या एका धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. खापरखेडा ते कोराडी मार्गावरील रस्त्यावर एका महिला आणि एका पुरुषाने मिळून एका व्यक्तीवर चाकूने वार करत हत्या केल्याची घटना घडली.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, या हल्ल्यात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव सागर वानखेडे (रा. सावंगी, ता. नरखेड, जि. नागपूर) असे असल्याची माहिती समोर येत आहे. घटनेच्या वेळी सागर वानखेडे हे MH-31-D-1425 क्रमांकाच्या दुचाकीवरून त्या मार्गाने जात असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, रस्त्यावरच अचानक दोन आरोपींनी सागर वानखेडे यांच्यावर धारदार चाकूने वार करण्यास सुरुवात केली. हा प्रकार इतक्या अचानक घडला की रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांनी हा संपूर्ण घटनाक्रम उघड्या डोळ्यांनी पाहिला. मात्र आरोपींच्या हातात चाकू असल्यामुळे कोणीही मदतीसाठी पुढे जाण्याचे धाडस करू शकले नाही, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
हल्ला केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेले. घटनेची माहिती मिळताच खापरखेडा पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. जखमी अवस्थेत असलेल्या व्यक्तीची तपासणी केली असता त्यांचा मृत्यू झाल्याचे आढळून आले.
मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
या भरदिवसा घडलेल्या घटनेमुळे खापरखेडा परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
⚠️ घटनेबाबत अधिकृत माहिती पोलिसांकडून येणे बाकी असून पुढील तपास सुरू आहे.
घटनास्थळी खापरखेडा व कोराडी पोलीस पोहोचले असुन मयत इसमाचे प्रेत ताब्यात घेऊन त्याचे प्रेत उत्तरीय तपासणीसाठी मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी खापरखेडा पो. स्टे चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरिश रुमकर तथा त्यांचे अधिकारी व कर्मचारी तसेच कोराडी पो. स्टे.चे सहायक पोलीस निरीक्षक म्हात्रे व कर्मचारी घटनास्थळी पोहोचुन पंचनामा करीत माहिती गोळा करीत आहेत.
आताच हाती आलेल्या माहितीनुसार या घटनेतील आरोपी महिला व तिच्या साथीदाराने खापरखेडा पो. स्टे. येथे आत्मसमर्पण केले आहे.
हे प्रकरण अनैतिक संबंधातून झाले कि काही पारिवारिक कारणातून झाले याचा तपास कोराडी व खापरखेडा पोलिस संयुक्तरित्या करीत आहेत. यासंदर्भात अधिक्रृत माहिती पोलिस लवकरच मीडिया समोर देणार आहेत.



































