Vansh News Digital Web portal online.
महादुला कोराडी /नागपुर : 25 फेब्रुवारी 2026.
नागपुर जिल्ह्यात महिला व बाल अत्याचारात सातत्याने वाढ होत असून त्यांवर नियंत्रण ठेवण्यात ग्रृहखाते सपशेल अपयशी ठरलेले आहे. काल नागपुरात महादुला नगरपंचायत येथे एक तर शहरात दोन ठिकाणी बलात्काराच्या घटना घडल्या.
कोराडी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या महादुला नगरपंचायत येथील प्रभाग क्रमांक 2 मध्ये 15 वर्षिय अल्पवयिन शाळकरी मुलीवर 40 वर्षिय घरमालकाने खोलीत घुसून अत्याचार केला. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना दि. 23 फेब्रुवारी 2026 ची असुन 15 वर्षिय मुलगी ट्युशन हुन घरी परतली असता घरमालक हा किरायेदाराच्या खोलीत मागील दारातुन घुसला आणि तिला तिच्या आईचा आधी नंबर मागितला व तिला WhatsApp वर बोलण्यासाठी दबाव टाकला तिने या गोष्टीला नकार देताच तिच्यावर घरमालकाने लैंगिक अत्याचार केला. पीडित मुलीने तिच्या आईला याविषयी माहिती सांगितली व हिम्मत करुन पिडित मुलगी व तिच्या आईने कोराडी पोलिस स्टेशन येथे जाऊन तक्रार केली. कोराडी पोलिसांनी लगेच आरोपी वर विविध कलमान्वये तसेच पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला. व आरोपीला लगेच अटक केली.पीडित मुलीला मेडिकल करण्यासाठी पाठवले डाँक्टरांचा तपास रिपोर्ट येताच काल दि. 24 फेब्रुवारी 2026 रोजी आरोपीला कोर्टात उभे केले. कोर्टाने आरोपीस जेलमध्ये रवानगी करण्याचा आदेश दिला असल्याची माहिती मिळत आहे.
दोन दिवस उलटले तरी कोराडी पोलिसांनी घटनेची प्रेसनोट पोलीस माहितीकक्षाला पाठवली का नाही ?
24 तासात घडलेल्या गुन्ह्याची तपशीलवार माहिती व प्रेस नोट माहितीकक्षाला पाठवणे बंधनकारक असतांना ही कोराडी पोलिसांनी अद्याप पोस्को अंतर्गत गुन्ह्याची प्रेस नोट पाठवली नाही ? Vansh News Digital Web portal ने नागपुर पोलीस आयुक्त्यातांच्या माहिती कक्षाकडे या घटनेची प्रेस नोट पाठवली आहे का? याची शहानिशा केली असता दिन. 23 व 24 फेब्रुवारी ला कुठेही प्रेसनोट Google वर नागपुर पोलीस आयुक्तांच्या अधिक्रृत पोर्टल वर माहिती दिसलीच नाही त्यामुळे कोराडी पोलिसांची काय भुमिका आहे ? . 23 व 24 फेब्रुवारी 2026 या दोन्ही दिवशी कोणतीही प्रेस रिलीज कोराडी पोलिसांनी का नाही पाठवली? यांवर नागपुर पोलीस आयुक्त (शहर) रविंद्र सिंघल जाब विचारणार का कोराडी पोलिसांना. पोस्को गुन्ह्यातील अटकेतील आरोपीस एकही थापड सुद्धा लगावली नसल्याचे समजते. उलट त्याचा पीसीआर का नाही मागितला? कोराडी पोलिसांनी याबद्दल उलटसुलट चर्चा सुरू आहेत. काही राजकीय दबावाखाली हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न तर होत नाही ना? कोराडी पोलिस स्टेशन अंतर्गत क्राईम रेट कमी दिसावा यासाठी प्रेस रिलिज (प्रेस नोट) पाठवल्या जात तर नसतील ना? नागपुर शहर अंतर्गत विभिन्न पोलीस स्टेशन कडुन दिवसभरातील Mornig, Afternoon, आणि Evening च्या प्रेस नोट पोलिस माहिती कक्षाला डायरी पाठवणे बंधनकारक आहे. मात्र माहिती का पाठवली जात नाही? याची चौकशी करण्याची गरज आहे.
आरोपीस एका माजी नगरसेवकांची मदत?
आरोपीस एका माजी नगरसेवकाच्या मदतीमुळे VIP ट्रीटमेंट मिळाली असल्याची गोपनीय सुत्राकडुन माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार आरोपीचा मित्र असलेला एक माजी नगरसेवक, हा आरोपीस अटक झाल्यानंतर सक्रीय झाला. त्यानंतर आरोपीस सेंट्रल जेल पास होईपर्यंत तो तिथे उपस्थित असल्याचेही समजते . त्यानंतर त्या माजी नगरसेवकाने आरोपीचा एका महिन्यात जामिन व्हावा यासाठी एका नामांकित वकिलाकडे सुद्धा तो आरोपीच्या नातेवाइकांना घेऊन गेलेला होता असेही समजते. पोस्को एक्ट अंतर्गत अटकेत असलेल्या आरोपीस जमानत मिळु नये यासाठी कोराडी पोलिस जामिनास विरोध करतील का? कि लगेच एक महिन्याच्या आत आरोप
उथळ माथ्याने समाजात फिरेल? अशी उलटसुलट चर्चा जनमानसात सूरु आहे.आरोपी व आरोपीच्या कुटुंबास मदत करणाऱ्या माजी नगरसेवकास अल्पवयिन मुलीच्या अत्याचाराच्या घटनेबाबत चीड कमी व आरोपीला सहानुभूती दिसुन येते.




































