श्री सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online.
कामठी/नागपुर : 1 मार्च 2026
काल प्रिआंती इंग्लिश स्कुल & ज्युनिअर कॉलेज तरोडी (बु) ता. कामठी जि. नागपूर येथे विज्ञान प्रदर्शनी मोठ्या उत्साहात पार पडली. या प्रदर्शनीत विद्यार्थ्यांनी विज्ञान विषयावर आधारित विविध आकर्षक व उपयुक्त मॉडेल्स सादर केली. पर्यावरण संरक्षण, सौरऊर्जा, पाणी बचत, रोबोटिक्स तसेच दैनंदिन जीवनातील वैज्ञानिक संकल्पनांवर आधारित प्रकल्पांना उपस्थितांकडून विशेष दाद मिळाली.

कार्यक्रमाचे उद्घाटन श्री गजानन शिक्षण सेवा संस्थेचे सचिव रमेशजी लेकुरवाळे सर यांच्या हस्ते करण्यात आले. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले असून पालक व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रदर्शनाला प्रतिसाद दिला. उत्कृष्ट प्रकल्प सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
या विज्ञान प्रदर्शनीमुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन व नवकल्पनांना प्रोत्साहन मिळाले.


































