श्री सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online.
महादुला-कोराडी/नागपुर : 4 मार्च 2026.
नागपुर जिल्ह्यातील महादुला कोराडी येथे बाल अत्याचाराच्या घटनेत वाढ होत असून यांकडे स्थानिक पोलीस प्रशासन व आरोग्य प्रशासन गाढ झोपेत तर नाही ना अशी नागरिकांत चर्चा सुरू आहे.
8 दिवसांपुर्वी महादुला प्रभाग क्र. 2 मध्ये एका 15 वर्षिय अल्पवयिन मुलीवर घरमालकाने अत्याचार केला.पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून कोराडी पोलीस स्टेशन ला गुन्हा दाखल झाला आरोपीस अटक झाली त्याला दुसऱ्याच दिवशी कोर्टात उभे करुन त्याला सेंट्रल जेलमध्ये रवानगी झाली पण त्या घटनेतील आरोपीचा कोणताही PCR कोराडी पोलिसांनी घेतला नाही. गुमथी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डाँक्टरांच्या टीमने पीडित मुलीवर उपचार करण्यासाठी कोणतेही प्रयत्न केलेले आढळले नाही.
दुसरी घटना काल सकाळी 9 च्या सुमारास नवीन कोराडीतील वार्ड क्र. 2 मध्ये 70 वर्षिय आजी सिंधु लीलाधर ठाकरे हिने आपल्या साडे तीन वर्षाच्या ओम नामक चिमुकल्याच्या अंगावर गरम उकळते पाणी फेकल्या ची ह्रदयद्रावक घटना घडली. घटनेत चिमुकला ओम हा 45% भाजल्याचा प्राथमिक माहिती पुढे आली आहे. त्याचेवर नागपुरच्या नेल्सन हास्पिटल येथे उपचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
घटना घडुन 30 तास उलटले तरी स्थानिक पोलीस व आरोग्य प्रशासनाला कोणतीही माहिती नाही
काल कोराडी त झालेल्या दुर्देवी घटनेला 30 तास उलटले तरीही स्थानिक कोराडी प्राथमिक आरोग्य उपकेंद्र तसेच कोराडी पोलिस स्टेशन ला घटनेची कोणतीही माहिती नाही याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. स्थानिक पोलीस यंत्रणा व आरोग्य यंत्रणा एवढी कशी गाफील आहे? काल होळीनिमित्त कोराडी पोलिसांचे बीट मार्शल यांना ही घटना का माहिती पडली नाही किंवा पोलिसांची पेट्रोलिंग सुरु असतांना या दुर्दैवी घटनेबद्दल कोणतीच माहिती का मिळाली नसावी? स्थानिक जनप्रतिनिधी यांनी या घटनेबद्दल कोराडी पोलिसांना का नाही कळविले?

घटनेचा CCTV video सोशल मीडिया वर कालपासून वायरल झाला अजुनही कोराडी पोलिस Action Mode वर केव्हा येणार? नाही तेव्हा बोगस FIR करायला स्थानिक कोराडी PI व त्यांचे अधिकारी पुढे असतात. इथे कोराडी पोलिसांची भुमिकेवर आता प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
नागपुर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे कालच्या दिवशी कोराडी येथील त्यांच्या निवासस्थानी जनतेला होळीच्या शुभेच्छा देत होते. कार्यकर्ते बावनकुळे साहेबांना गुलाल लावत होते तर दुसरीकडे त्यांच्याच नवीन कोराडीतील वार्ड क्र. 2 मध्ये चिमुकल्या ओम वांगे च्या अंगावर गरम उकळते पाणी ओतण्याची घटना घडली आणि ही माहीती त्यांच्या सुद्धा कानावर का गेली नसावी? संबधित घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन नागपुर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अतितातकाळ कोराडी पोलिसांना अतितातकाळ FIR दाखल करण्याचे आदेश द्यावेत. व स्थानीय आरोग्य यंत्रणेच्या डाक्टर्स च्या टीमला ( आशा वर्कर्स) ओमवर विशेष उपचार मिळावे यासाठी दिशानिर्देश द्यावेत अशी स्थानिक नागरिकांची मागणी होत आहे. आणि कोराडी पोलिसांच्या गाफील यंत्रणेचा समाचार घ्यावा.



































