श्री सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online.
कोराडी /नागपुर : 7 मार्च 2026.
नागपुर जिल्ह्यातील कोराडी ग्रा. पं. येथील वार्ड क्र. 2 मध्ये धुलीळवळीच्या (होळी) दिवशी एका आजीने तिच्या नातवाच्या अंगावर गरम उकळते पाणी टाकल्याने तो 45% जळाला होता.
झालेल्या ह्रदयद्रावक घटनेमुळे समाजात त्या नालायक आजी सिंधु ठाकरे विरोधात तीव्र संतापाची लाट उसळली होती. तिच्यावर गुन्हा दाखल करण्याची जनतेतुन मागणी होत होती.झालेल्या घटनेत उकळत्या पाण्यामुळे जळालेला साडे तीन वर्षाचा ओम भांगे ह्या तिमुकल्यावर धागपुरातील नेल्सन हास्पिटल येथे उपचार सुरू आहेत. परंतु काल सोशल मीडिया वर त्याच्या संदर्भात काही लोकांनी कोणतीही शहानिशा चौकशी न करता त्याला श्रद्धांजली देण्याचे स्टेट्स ठेवले त्यामुळे नविन कोराडी येथील ओम चे कुटुंबिय, त्याचे आईवडील, मामा यांना खुप वाईट व विचित्र अनुभव आला. ओम सुखरुप असुनही काही लोकांनी अशा पद्धतीने ते स्टेट्स ठेवणे व श्रद्धांजली देणे हे क्लेषदायक असुन अशा समाजकंटकांविरोधात सायबर गुन्हे शाखेकडे त्यांची तक्रार करणार अशी माहिती ओम चे मामा रविंद्र ठाकरे यांनी VANSH News Digital Web portal ला बोलतांना सांगितले. त्याचबरोबर ओम हा सुखरुप आहे काल त्याचेवर शस्त्रक्रिया (सर्जरी) झाली असुन सध्या ओम ची तब्येत स्थिर आहे. हितचिंतकांनी कोणतीही काळजी करु नये. अफवा उडवणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई होईल असेही रविंद्र ठाकरे यांनी सांगितले.झालेल्या या घटनेत ओमची आजी सिंधु ठाकरे विरोधात कोराडी पोलिसांकडे तक्रार झाली व तिच्यवरस गून्हा सुद्धा दाखल झाल्याची माहिती रविंद्र ठाकरे यांनी सांगितले.
तसेच कोराडी चे माजी सरपंच नरेंद्र धानोले यांनी ही Vansh News ला सांगितले की झालेली घटना दुर्दैवी असुन अशा घटना समाजात घडु नये. लोकांनी सोशल मीडिया चा जपुन वापर करावा. खोट्या बातम्या अफवा समाजात पसरवु नये त्यामुळे पीडित कुटुंबियांना मानसिक त्रास सहन करावा लागतो असेही कोराडी चे माजी सरपंच नरेंद्र धानोले यांनी सांगितले.




































