श्री सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online.
महादुला नगरपंचायत /नागपुर : 12 मार्च 2026.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महादूला नगरपंचायत व नवक्रांती शहर स्तर संघ महादुला यांच्या संयुक्त विद्यमाने महिला मेळाव्याचे सफल आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महादुला नगराध्यक्षा हेमलता मनोज सावजी होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून उपाध्यक्ष वैशाली पवन पखिड्डे अभिजीत ढेंगरे (बांधकाम सभापती), स्वाती दिलीप पटले (सभापती महिला व बालकल्याण), मुख्याधिकारी अमर हांडा, नगरसेविका स्वाती लांडे, गंगा जैन,सोनु उघडे, पुजा मेश्राम, संध्या साबळे, आम्रपाली सोनारे, प्रतिभा गजभिये आदी प्रामुख्याने उपस्थित होते.यावेळी आमंत्रित पाहुण्या स्नेहलता घोपे यांनी महिलांना सायबर गुन्हे होऊ नये यासाठी काय खबरदारी घ्यावी यांवर मार्गदर्शन केले. तर प्रांजली पंचबुद्धे यांनी पर्यटन विभागाच्या विविध योजना सांगितल्या. यावेळी अनेक मान्यवर महिला दिनी समायजितनी भाषणे केली.


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या नगराध्यक्ष हेमलता मनोज सावजी यांनी आपल्या भाषणात सांगितले की, महिलांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, जिजामाता, माता रमाई, अहिल्याबाई होळकर यांच्या त्याग आणि बलिदानातून महाराष्ट्र घडलाय. आज त्यांच्यामुळे आपण प्रगतीची शिखरे गाठत आहोत. पण बदलत्या समाजिक जीवनात महिलांनी आत्मनिर्भर होण्यासाठी रोजगारसक्षम होणे आजच्या काळाची गरज आहे असे हेमलता सावजी यांनी महिलांना आत्मनिर्भर चे सल्ला दिला.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व प्रतिमेला माल्यार्पणाने झाली. यावेळी मुख्याधिकारी अमर हांडा यांनी महादुला नगरपंचायत तर्फे राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांच्या माध्यमातून स्वतःचे आर्थिक उत्पन्न महिलांनी वाढवावे असे आवाहन केले.
यावेळी शैकडो महिलांची नेत्रतपासणी करुन त्यांना मोफत चश्मे तसेच 5 महिला बचत गटांना कर्जमंजुरी चे पत्र वाटप करण्यात आले.महिला दिनी आयोजित कार्यक्रमात विविध महिलांनी न्रृत्य, गीतगायन समुहगीत विविध स्पर्धा या निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रमही झाले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रेखा कढव(समुदाय संघठिका), यांनी तर प्रास्ताविक धर्मेद्र गजभिये यांनी केले.

































