लावण्य ठाकरे व अद्वैत धुर्वे यांचा महादुला नगरपंचायत येथे झाला सत्कार!
श्री सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online.
महादुला नगरपंचायत /नागपुर : 9 मार्च 2026.
नागपुर येथील महाराष्ट्र स्पोर्ट्स अकाडमी च्या दोन विद्यार्थ्यांची श्रीलंका येथे होणाऱ्या क्रीमसाँन लीग इंटरनैशनल कराटे चैंपियनशिप साठी निवड झाली आहे.
महाराष्ट्र स्पोर्ट्स अकाडमी नागपुर चे दोन विद्यार्थी लावण्य ठाकरे (महादुला नगरपंचायत ) व अद्वैत धुर्वे (नागपुर) यांनी प्रशिक्षक मिलिंद शिरपूरकर, आशिष कांबळे, राहुल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली यांनी हे यश मिळविले असुन हे दोन्ही नागपुरचे विद्यार्थी श्रीलंकेत सुगथादास इंन्डोर स्टेडियम येथे होणाऱ्या क्रिमसाँन लीग इंटरनैशनल कराटे चैंपियनशिप साठी दि. 11 मार्च 2026 ला जाणार आहेत.
महादुला नगरपंचायत तर्फे या कराटेपटुंचा झाला सत्कार

महादुला नगरपंचायत तर्फे होतकरू विद्यार्थी लावण्य ठाकरे व अद्वैत धुर्वे यांचा नगराध्यक्ष हेमलता मनोज सावजी, उपाध्यक्ष वैशाली पवन पखिड्डे, नगरसेविका गंगा विजय जैन तसेच रामटेक चे पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे यांच्या तर्फे अमर हांडा (मुख्याधिकारी महादुला नगरपंचायत) यांच्या उपस्थितीत काल आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित एका कार्यक्रमात जाहीर सत्कार करण्यात आला.

यावेळी विविध नगरसेवक /नगरसेविका तसेच शहरातील शेकडोंच्या संख्येने महिला या कार्यक्रमांला प्रामुख्याने उपस्थित होत्या.



































