श्री सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online.
नवी दिल्ली : 9 मार्च 2026
ओडिशा राज्यात 16 मार्च रोजी होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने महत्त्वाचा निर्णय घेतला असुन या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाने महाराष्ट्राचे महसूल मंत्री भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांची केंद्रीय पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून ही जबाबदारी देण्यात आली असून पक्षाच्या निवडणूक व्यवस्थापनात त्यांची महत्त्वाची भूमिका असणार आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबिन यांनी या नियुक्तीची अधिकृत घोषणा केली. राज्यसभेच्या निवडणुकीत पक्षाची रणनीती प्रभावीपणे राबवण्यासाठी अनुभवी नेत्यांवर जबाबदारी सोपवण्यात येत असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले आहे.
या नियुक्तीनंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी महत्त्वाची जबाबदारी दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांचे विशेष आभार व्यक्त केले. पक्षाने दाखवलेल्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी आपण पूर्ण प्रामाणिकपणे काम करू, असेही त्यांनी स्पष्ट केले. संघटनात्मक शिस्त पाळत आणि पक्षाच्या मार्गदर्शनानुसार ही जबाबदारी पार पाडू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.



































