श्री सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online.
कोराडी /नागपुर : 11 मार्च 2026
आज सकाळी कोराडी महाजेनको 660 वीज प्रकल्पातील टर्बाइन मेंटेंनंस मध्ये झालेल्या वाफगळतीच्या घटनेसंदर्भात महाजेनको प्रशासनाने खुलासा दिला आहे. त्यात महाजेनको कोराडी प्रशासनाने सांगितले की, “कोराडी औष्णिक विद्युत केंद्र येथील, 660 मेगावॅट संच क्र. 8 च्या एच.पी. हिटरच्या स्टार्टअप व्हेंट फ्लॅंजमध्ये गळती (leakage) असल्याने, देखभाल आणि दुरूस्तीचे कार्य महानिर्मितीच्या कर्मचार्यांच्या आणि कंत्राटी कामगारांच्या उपस्थिती आणि देखरेखीमध्ये, सुरू होते. उपरोक्त कार्य सुरू असतांना थोडी वाफ बाहेर पसरली.”
“त्यावेळी साइटवर काम करणारे कर्मचारी आणि कंत्राटी कामगार तात्काळ बाजूला झाले, तातडीचे पाऊले उचलल्याने केवळ एका व्यक्तीस वाफेचा अत्यंत किरकोळ दाह झाला, कुणालाही कुठलीही मोठी इजा झाली नाही. मात्र सावधगिरीचा उपाय म्हणून सर्व कामगारांना अतितत्काळ महानिर्मितीच्या दवाखान्यात प्रथमोपचार देण्यात आला आणि महानिर्मिती प्रशासनाद्वारे तातडीने आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या.”

“वाफेचा दाह अत्यंत किरकोळ असल्याने त्या ठिकाणी काम करणाऱ्या सर्व मनुष्यबळाला लगेच डिस्चार्ज करण्यात आले, सर्वांची प्रक्रृती सध्या सुखरुप आहे. महानिर्मितीचे वरिष्ठ प्रशासन, वरिष्ठ अधिकारी, संबधीत अधिकारी अभियंते या घटनेकडे गांभीर्याने लक्ष देऊन आहेत, आणि कामगारांच्या आरोग्याला प्राधान्यक्रम देऊन आवश्यक ती वैद्यकीय मदत तातडीने मिळण्यासाठी सर्व संबधितांना उपाययोजना करण्यात आल्या.”
महाजेनको कोराडी प्रशासनाला आवश्यक ती खबरदारी घेत कामगार व कर्मचारी यांचेवर अतितातकाळ प्राथमिक उपचार उपलब्ध करुन दिल्याबद्दल कामगार व कर्मचारी यांनी मुख्य अभियंता विलास मोटघरे तसेच महाजेनको कोराडी प्रशासनाचे आभार व्यक्त केले.मुख्य अभियंता विलास मोटघरे यांच्या मार्गदर्शनाखाली कामगार व कर्मचारी यांच्या आरोग्याला प्राधान्य देत सर्व यंत्रणा कामी लावली होती हे विशेष!



































