श्री सुनील उत्तमराव साळवे (9637661378 /9527190782) मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online
सावनेर / खापा परिसर /नागपूर :11 मार्च 2026
सावनेर तालुक्यातील खापा पोलीस स्टेशन हद्दीत गडमी पेंढरी (कोथरूडला शिवार) येथे बुधवारी दुपारी सुमारे २ वाजताच्या दरम्यान रानहल्यांच्या कळपाने दोन महिलांवर हल्ला केल्याची दुर्दैवी घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार रेश्मा विकास धुर्वे (वय २८) आणि निशा युवनाते या दोघी महिला महसूल विभागात कार्यरत असलेल्या रेवणी इन्स्पेक्टर कानारकर यांच्या शेतात होत्या. त्याच वेळी अचानक रानहल्यांचा कळप शेतात आला आणि या दोघींवर हल्ला केला.
या घटनेत रेश्मा विकास धुर्वे यांचा जागीच मृत्यू झाला, तर निशा युवनाते या गंभीर जखमी झाल्या असून त्यांना उपचारासाठी नागपूर येथील मेडिकल रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच खापा वनपरिक्षेत्र विभाग, महसूल विभाग तसेच खापा पोलीस स्टेशनचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.
घटनास्थळी दुर्गम गावात रुग्णमित्र हितेश बंसोड हे पोहोचले असुन त्यांनी पोलिसांच्या मदतीने म्रतकांचे शरीर उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात हलविले.
स्थानिक नागरिकांची मागणी
परिसरात रानहल्यांचा कळप वारंवार येत असल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.त्याचबरोबर घटनेतील म्रृत महिलेच्या परिवारातील एका व्यक्तीस शासकीय नोकरी मिळावी तसेच म्रृतकाच्या परिवारास 25 लाख रुपयांची आर्थिक मदत तसेच जखमी महिलेला सुद्धा उपचारासाठी योग्य ती शासकीय मदत मिळाली पाहिजे अशी येथील नागरिकांनी केली
Devendra Fadnavis
Dr. Ashishrao R. Deshmukh
Chandrashekhar Bawankule FC
Adv. Ashish Jaiswal
everyone
highlight
followers
nonfollowers
nonfollowersviewersfollowers .



































