श्री. सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online.
कोराडी /नागपुर : 11 मार्च 2026.
नागपुर जिल्ह्यातील कोराडी महाजेनको 660 MW वीज प्रकल्पात आज सकाळी 10 वाजताच्या सुमारास दुर्घटना घडली असुन या दुर्घटनेत 4 जणांना थोडी सी इजा पोहोचल्यची सुत्रांनी माहिती दिली आहे.
कोराडी महाजेनको च्या टर्बाइन मेंटेनेंस मधील Hot Air pipeline अचानक लिकेज झाल्याने मोठी स्ट्रीम (गरम वाफ) निघाल्याने तिथे उपस्थित 4 जण पोळल्याची माहिती पुढे येत आहे. कोराडी महाजेनको चे कर्मचारी रविंद्र नांदुरकर (वय 50 वर्षे), विशाल कांबळे (सुपरवायझर वय 40 वर्षे), राहुल केळकर फिटर (वय 35 वर्ष), शैलेष मेश्राम वय (35 वर्ष) आदींच्या हात व पायांवर गरम वाफ आली त्यामुळे त्यांच्या हातापायाची त्वचा हलकीशी पोळल्याची माहिती असुन महाजेनको प्रशासनाने अतितातकाळ कोराडी महाजेनको च्या कोराडी काँलनीतील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. चौघांची ही प्रक्रृती सध्या सुखरुप आहे. यावेळी सेक्शन इंचार्ज, सुरक्षा अधिकारी, कर्मचारी सर्व उपस्थित होते.


कोराडी महाजेनको 660 मेगावॉट प्रकल्पातील विविध विभागाशी निगडित stream पाईपलाईन,Aish पाईपलाईन नेहमी लिकेज होत असतात याचे वेळोवेळी आँडिट करायला हवे जेणेकरून अशा दूर्घटनेला आळा बसेल. परंतु याकडे नेहमी दुर्घटना होतात आणि परिणामी कर्मचारी व कामगारांच्या जीवाला धोका निर्माण होतो.नेमकी दुर्घटना कशामुळे घडली याची चौकशी महाजेनको कोराडी प्रशासनाने घेतली पाहिजे. मुख्य अभियंता विलास मोटघरे ह्या घटनेकडे गांभीर्याने लक्ष देऊन असुन महाजेनको तील या दुर्घटनेतील दुर्घटनाग्रस्त कामगारांच्या आरोग्याला प्राधान्य देऊन महाजेनको प्रशासनाकडून योग्य ते सहकार्य व उपचार मिळण्यासाठी त्यांनी सुचना दिल्या आहेत.



































