चंद्रपुरातील मुख्य आरोपी मुजिबुर लतिफ कूरेशी , नागपुर चा सुरेंद्र तेलंग 25 दिवसापासून फरार, चंद्रपुर पोलिसांच्या तपास यंत्रणेवर प्रश्नचिन्ह ?
श्री सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online.
चंद्रपूर: 12 मार्च 2026.
रेल्वेत टी.सी. ची नोकरी लावून देतो असे सांगून 15 ते 16 युवकांची 1 कोटी 31 लाख 60 हजार रूपयांनी फसवणूक करणाऱ्या चंद्रपुरातील मुख्य आरोपीं मुजिबुर लतीफ कुरेशी (50), रवींद्र संबाजी वाघमारे (45) व सुरेंद्र रामकृष्ण तेलंग (50) नागपूर या तिघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
मुख्य आरोपी – मुजिबुर लतीफ कुरेशी (चंद्रपुर)

सुरेंद्र रामकृष्ण तेलंग

बनावट टी सी. ओळखपत्र

विशेष म्हणजे या तिन्ही आरोपींनी रेल्वे टि.सी. चे बनावट नियुक्ती आदेश पत्र, प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र, बँकेचे धनादेश व पोलीस व्हेरिफिकेशन इत्यादी कागदपत्र देवून ही फसवणूक केली आहे. दिल्ली, कोलकता नांदेड भंडारा जळगाव तेलंगणा गडचिरोली चंद्रपूर नागपूर महाराष्ट्र मध्ये बरेच जिल्ह्यात मुजिबुर लतिफ कुरेशी आणि तेलंग यांच्यावर गुन्हे दाखल आहेत रेल्वे प्रशासन वनविभाग अनेकांचा या फसवणूक प्रकरणात सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे. गुन्हा दाखल होताच आरोपी पसार झाले असून 25 दिवसांचा कालावधी लोटून आरोपी मोकाट आहेत.
येथील रहिवासी कौस्तुभ आदे या बेरोजगार युवकाने पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, पवन वाघमारे,, इक्राम शेख, हरीश अकुला रा. अहेरी , गोपाल मुंडले रा. भंडारा पवनी, विपीन गणवीर, दिनेश अंड्रस्कर , अशोक सातपुते, रविंद्र वांढरे, शेख सय्यद रा. यवतमाळ, नागराज अंबाला रा. घुग्घुस, अनुष शेंडे रा. खमरटोला ता. देसाईगंज, हरीहर मेश्राम रा. भंडारा, गंगाधर पेंड्याला रा. मंचेरियल, इम्रान पठाण रा. बल्लारशा येथील 15 ते 16 युवकांना रेल्वे विभागात टीसीची नोकरी लावून देतो असे आमिष दाखवणारे मुख्य आरोपी मुजिबुर लतीफ कुरेशी याने दाखविले. या सर्व युवकांकडून दहा ते बारा लाख रूपये नोकरीसाठी वसूल केले. त्यानंतर या सर्व युवकांना कोलकता येथे नोकरी लागली असे सांगून सर्वांना चंद्रपूर येथे एकत्र बोलविले. तिथून नागपूर येथे घेवून गेले व नागपूर येथून विमानाने कोलकता येथे नेले. कोलकता येथे जात असतांना विमानतळावर मुजीबुर कुरेशी याचे सहकारी सुरेंद्र तेलंग व रविंद्र वाघमारे सोबत होते.
कोलकत्ता येथे सर्व युवकांना एका मोठ्या हॉटेलमध्ये मुक्कामी ठेवण्यात आले. तिथे हॉटेलातच पाच ते सहा दिवस थांबवून दररोज वेगवेगळ्या ठिकाणी फरवण्यात आले. टीसीचे प्रशिक्षण करायचे आहे असे सांगून युवकांना प्रशिक्षण शाळेत नेवून प्रमाणपत्रे देण्यात आली. बोगस पोलीस व्हेरीफिकेशन पत्र देवून बनावट नियुक्तीपत्र देण्यात आले. एक ते दिड वर्ष कोलकता येथे राहिल्यानंतर फसवणूक झाल्याची बाब निदर्शनास आली. त्यामुळे युवकांनी पैसे परत मागण्यास सुरूवात केली. यावर मुजीबुर कुरेशी याने पैसे परत मिळणार नाही, रेल्वेत जमले नाही तर इतर सरकारी विभागात नोकरी लावून देतो असे सांगितले. दरम्यान हा सर्व प्रकार सुरू असतांना अशाच एका फसवेगिरीच्या प्रकरणात कुरेशी हा एक वर्ष नांदेडच्या कारागृहात शिक्षा भोगून आल्याचे माहिती झाले. त्यामुळे सर्वांनीच पैशासाठी तगादा लावला. दरम्यान कुरेशी याने पैसे नसलेल्या एका बँकेचे धनादेश सर्वांना दिले. धनादेश बँकेत वटविण्याकरिता टाकले असता सर्व धनादेश परत आले.
दरम्यान सातत्याने खोटे बोलून फसवणूक केली जात असल्याचे निदर्शनास येताच मुजिबुर लतीफ कुरेशी, रविंद्र संबाजी वाघमारे , सुरेंद्र रामकृष्ण तेलंग या तिघांविरूध्द तक्रार दाखल केल्यानंतर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून 25 दिवस उलटले मात्र, आरोपींना अटक करण्यात अद्यापही पोलिसांना यश आले नाही. त्यामुळे पोलिसांच्या कार्यवाहीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.






























