श्री सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online.
कोराडी /नागपुर : 18 मार्च 2026.
नागपुर शहर पोलीस अंतर्गत येणाऱ्या कोराडी पोलिस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पोपट धायतोंडे यांची नागपुर शहर पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल यांचे आदेशानुसार अतितातकाळ बदली करण्यात आल्याची खात्रीलायक माहितीनुसार माहिती पुढे आली आहे.
कोराडी पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणुन फक्त 10 महिन्याचा काळ झाला होता. केवळ राजकीय दबावाखाली काही निरपराध लोकांविरोधात बोगस FIR करण्यापलीकडे त्यांची कारकीर्द राहिली नाही. ते कार्यरत असताना कित्येक मोठमोठे गुन्हे कोराडी पोलीस स्टेशन अंतर्गत घडले परंतु कोराडी पोलिसांनी गुन्ह्यांचा छडा लावण्यात कोणतीही उल्लेखनीय कामगिरी बजावली नाही हे विशेष.
कोराडी पोलीस स्टेशन अंतर्गत खुन, पोस्को, डकैती, वाळुतस्करी, अवैध दारु, अवैध सट्टा पट्टी त्याच्याबरोबर मोठ्यर प्रमाणात चोऱ्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. कित्येक गंभीर गुन्हे, व अवैध व्यवसाय वाढीला लागल्याची नागरिकांची चर्चा आहे. अवैध व्यवसायांवर कुठलेही नियंत्रण त्यांनी मिळवलेले नाही.कोराडी पोलीस स्टेशन अंतर्गत 24 तासाच्या आत घडलेल्या गुन्ह्याची कोणतीही माहिती पोलिसांच्या माहिती कक्षाला कळविणे आवश्यक असतांना माहिती कक्षाला कोराडी पोलिस माहितीच पाठवित नसल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. प्रेस नोट कोराडी पोलिस न पाठवता क्राईम रेट झिरो दाखवण्यचान्हे प्रयत्न दिसत होता.
अशातच नागपुर शहर पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल यांचे आदेशानुसार पोपट धायतोंडे याची बदली करण्यात आली आहे. त्यांचे जागी कळमना पोलिस स्टेशन चे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश रामदास धुमाळ यांची बदली करण्यात आली आहे.


































