श्री सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online.
नागपुर : 17 मार्च 2026.
विदर्भातील कोराडी, खापरखेडा, चंद्रपुर आणि पारस हे चार ही वीज प्रकल्प ड्रोनद्वारे उडवण्याची धमकीचा ईमेल आज दुपारी एकाच वेळी आल्याने चार ही वीज प्रकल्पात खळबळ उडाली आहे.
प्राप्त माहितीनुसार दुपारी हा ईमेल आल्याची प्रृष्टी झाली असुन त्यानंतर नागपुरातील कोराडी खापरखेडा वीज प्रकल्पातील मुख्य अभियंता मुख्य सुरक्षा व्यवस्थापक यांनी अतिसतर्कतेचा इशारा म्हणून पोलिसांच्या मदतीने विविध सेक्शन मध्ये सर्च आपरेशन राबविले. यामधे वीज प्रकल्पात डॉग स्क्वाड, BDDS, QRT तैनात करण्यात आले असुन खबरदारी चा इशारा म्हणून वीज प्रकल्पातील विविध सेक्शनमध्ये सुरु असलेले सर्वेसाठी उडवणारे ड्रोन सध्या उडविण्यावर बंदी टाकण्यात आल्याची माहिती कोराडी औष्णिक वीज केंद्राचे मुख्य सुरक्षा व्यवस्थापक देव राठोड यांनी सांगितली. कोराडी औष्णिक वीज केंद्राचे मुख्य अभियंता विलास मोटघरे संपुर्ण घडामोडींवर लक्ष ठेवून आहे. कोणीतरी खोळसाळपणातुन असा ईमेल पाठविला असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
विविध वीज प्रकल्पात राबविण्यात आलेल्या सर्च आपरेशन मध्ये सध्या तरी काही आक्षेपार्ह वस्तु किंवा बांबसद्रृश्य वस्तु आढळलेल्या नाहीत.
कोराडी चे मुख्य सुरक्षा अधिकारी देव राठोड हे यासंदर्भात कोराडी पोलीस स्टेशन ला तक्रार दाखल करणार असल्याचे समजते..आता ही कोरी अफवा आहे की, कट आहे. हे एक दोन दिवसात पुढे येईलच.
तुर्तास कोराडी खापरखेडा सोबतच चंद्रपुर व पारस वीज प्रकल्प हाय अलर्ट मोडवर आहेत.
BreakingNews #NagpurNews #Khaparkheda #PowerPlant #BombThreat #Koradi #maharashtranews
Devendra Fadnavis
Adv. Ashish Jaiswal
Dr. Ashishrao R. Deshmukh
Dr Nitin Raut
Chandrashekhar Bawankule FC
SudhirMungantiwar
everyone
highlight
followers
nonfollowers
nonfollowersviewers
fbreels2026
fbpost2026
































