श्री सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online.
कामठी /नागपुर : 16 मार्च 2026
होळीच्या पूर्वसंध्येला नवीन कामठी परिसरातील पोलीस चौकीसमोर काही समाजकंटकांनी केलेल्या प्राणघातक हल्ल्यात एकाचा जागीच मृत्यू झाला तर या हल्ल्यात गंभीर जखमी तरुण मोहित डहाट चा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने कामठी शहरात संतापाची लाट उसळली होती. कामठी शहरात अलीकडे गुन्ह्य़ात वाढ होत असून पोलिसांचे वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण नाही.कामठीत डीसीपी झोन क्र. 6 कार्यालय इथे बनविण्यात आले असे असतांना कामठीत गुन्हे सातत्याने वाढतात कसे? असा प्रश्न जनता विचारत आहे.
कामठीत गुन्हेगारी तत्त्वाने वर डोके काढले असुन नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.त्यातल्या त्यात कामठीत गांजा चरस व ड्रग्ज ची खुलेआम विक्री होत असल्याने कामठीतील युवा पिढी अंमली पदार्थाच्या व्यसनी जात आहे त्यांवर कामठी पोलिसांचे कोणतेही नियंत्रण दिसुन येत नाही.असे बसपाने आज सहा. पोलिस आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. त्या पार्श्वभूमीवर आज बसपा चे नगरसेवक नितेश कुमार मुरारीलाल यादव यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस आयुक्त अंकुश खेडकर झोन क्र. 6 यांना बसपाच्या शिष्टमंडळाने एक निवेदन देत कायदा व सुव्यवस्था राखण्याची मागणी केली.


यावेळी बसपाच्या शिष्टमंडळात माजी सभापती विकास रंगारी, बसपा कामठी शहर माजी अध्यक्ष नागसेन गजभिये,संदीप गणवीर, गीतेश सुखदेवे, सिद्धांत बागडे, राजन बागडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.































