श्री सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online.
महादुला कोराडी /नागपुर : 17 मार्च 2026
आज दिनांक 17/03/2026 मंगळवार रोजी दुपारी 12 वाजता के टी पी एस कंज्युमर क्रेडिट को. ऑप.सोसायटी कॉलनी या ठिकाणी हेमलता मनोज ठाकूर (सावजी) नगराध्यक्षा नगर पंचायत महादुला यांच्या नेतृत्वाखाली तसेच सचिन पाटील शहराध्यक्ष भाजप महादुला शहर, रामबाबू तोडवाल समन्वयक महादुला कोराडी यांच्या उपस्थितीत घरघुती गॅस सिलिंडर लोकांना व्यवस्थित मिळाले पाहिजे जेणेकरून जे काही समाजकंटक अफवा पसरवित आहे ते थांबले पाहिजे अश्या आशयाचे निवेदन सोसायटीचे अध्यक्ष रवींद्र कावळे यांना देण्यात आले.


निवेदना प्रमाणे त्यांनी माहिती दिली की कोणत्याच प्रकारचे गैस तुटवडा नाही आहे रोज सिलेंडर ची गाडी येत आहे परंतु काही लोकांच्या अफवांमुळे व्हॉट्सॲप विडियो मुळे लोक गोंधळून गेले आहे आणि ते सकाळपासून रांग लावीत आहेत आणि या काळात अचानक दोन हजार कनेक्शन जे सक्रिय नव्हते ते एक्टिव झाल्यामुळे ताण वाढला त्याच प्रमाणे आपल्या भागात अशिक्षिततेचे प्रमाण असल्यामुळे otp सांगण्यात लोकांना अडचण होत आहे आणि ते लोक गोडाऊन बाहेर रांग लागत आहे आणि अगोदर आम्हाला सिलेंडर द्या ही भूमिका घेत आहे. आम्हाला आमच्या नागपूर येथील HPCL कंपनी मधून स्पष्ट निर्देश आहे की आपण जेवढे otp ने सिलेंडर वाटप कराल तेवढेच आम्ही पाठवू आम्ही त्यांना विनंती केली की आपण दररोज दोन गाडी पाठवा जेणेकरून आम्ही लोकांना घरपोच सिलेंडर देऊ आणि लोक गोडाऊन बाहेर रांग लावणार नाही जनतेला आव्हान करण्यात आले की आपण मोबाईल वर गॅस बुकिंग करा 21 दिवसाने आपल्या घरी नेहमीप्रमाणे गाडी येईल आपण अस्वस्थ होऊ नका शासनाला सहकार्य करा एजन्सीला सहकार्य करा आणि लवकरच या समस्यावर निराकरण होईल गैस गोडाऊन जवळ जास्त गर्दी नव्हती रांग लागल्यामुळे एजन्सीची गाडी बाहेर पडू शकत नाही लोकांनी रांग लावली नाही तर गाडी बाहेर लोकांच्या घरापर्यंत जाईल लोकांनी घरीच थांबावे आणि सिलेंडर गाडीची वाट पहावी असे आवाहन करण्यात आले.
या प्रसंगी अभिजित ढेंगरे (गटनेता नगर पंचायत महादुला) स्वाती पटले (सभापती), सोनू उघडे (नगरसेविका),संध्या साबळे(नगरसेविका),गोपालसिंग नैकाने,(नगर सेवक), प्रीतम लोहसारवा (नगरसेवक) , विजय जैन माजी मंत्री कामठी तालुका तसेच गॅस ऑफिस येथील पदाधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.

































