श्री सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online.
महादुला-कोराडी /नागपुर : 18 मार्च 2026.
नागपुर जिल्ह्यातील महादुला नगरपंचायत येथे काल 17 मार्च च्या मध्यरात्री 12:30 वाजता 4 दुकानांची शटर अज्ञात चोरांनी फोडल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.
महादुला शहरातील शाम मेटल्स, मा अंबे हार्डवेअर, Vidarbha Hardware, Vidarbha Mobile अशी चार दुकानात चोरांनी हायड्रोलिक जैक च्या सहाय्याने शटर बेंड करुन आतमधे घूसण्याचा प्रयत्न केल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांनी दिली आहे.


शाम मेटल्स चे मालक शाम करमरकर यांनी काल मध्यरात्री मोबाईल वरुन Vansh News Digital Web portal ला ही माहिती दिली आहे. घटनेची माहिती मिळताच कोराडी पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते.
घटनास्थळावरून चार ही दुकानाच्या गल्ल्यातील अंदाजे 10-12 हजार रुपयांची रक्कम चोरांनी उडवली असल्याचे समजते. परंतु मोठे कोणते सामान चोरी गेले कि नाही याबाबत अजुनही कोणती खास माहिती मिळाली नाही. त्याबद्दल लवकरच माहिती पुढे येईल.
परंतु महादुला.हायवे वरील सर्विस रोडवर दोन्ही बाजूला मोठमोठी दुकाने असुन या दुकानाची शटर अशा पद्धतीने चोरांद्वारे फोडली जाणे म्हणजे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी येथील पोलीस यंत्रणा कुचकामी ठरली की काय? अशी नागरिकांत चर्चा सुरू झाली. सर्विस रोडवर रहदारी रात्रीबेरात्री सुरु असते. या भागात पोलिसांची गश्त पेट्रोलिंग नियमित नसल्याने वारंवार अशा घटना घडतात. त्यामुळे पोलिस गश्त वाढवण्याची स्थानिक दुकानदारांची मागणी आहे. स्थानिक दुकानांमधे cctv लावलेले आहेत परंतु cctv footege मध्ये काय माहिती मिळते हे तर पोलिसांच्या तपासानंतरच पुढे येईल.



































